आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonu Nigam And Y Films Launch India\'s First Transgender Band \'6 Pack\'

सोनू निगमने लाँच केला भारतातील पहिला ट्रान्सजेंडर बँड, अनुष्काही झाली सामील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 पॅक बँडच्या सदस्यांसोबत सोनू निगम - Divya Marathi
6 पॅक बँडच्या सदस्यांसोबत सोनू निगम
मुंबई- गायक सोनू निगमने बुधवारी (6 जानेवारी) पहिला ट्रान्सजेंडर म्यूझिक बँड लाँच केला आहे. 6 पॅक बँडचा हा अल्बम वाय फिल्म्सच्या बॅनरखाली रिलीज करण्यात आला आहे. अल्बमचे 'हम है हॅप्पी' हे पहिले गाणे सोनू निगमने यावेळी रिलीज केले. या गाण्याला ग्रॅमी विनर सिंगर फर्रेल्ल विल्यम्सच्या सुपरहिट 'हॅप्पी' गाण्याच्या थीमवर बनवण्यात आले आहे. गाण्यासाठी अनुष्का शर्मानेसुध्दा आवाज दिला आहे.
काय म्हणाला सोनू निगम...
इव्हेंटमध्ये सोनू निगमने सांगितले, 'मी या गोष्टीने दु:खी होतो, की ट्रान्सजेंडरना रिस्पेक्टेबल जॉब, चांगला उद्योग देऊ शकत नाही... आपण त्यांच्याकडे सामान्य लोकांप्रमाणे पाहात नाही. रस्त्यावर किंवा लग्नातच का पाहातो. असे किती दिवस चालणार? याचा विचार करून मी दु:खी झालो होतो.' सोनूने सांगितले, की बँडच्या सर्व सदस्यांची एनर्जी पाहून आनंद झाला. या बँडमध्ये सहा तृतीयपंथी गायक आहेत. ते भारतीय हिजडा कम्युनिटीमधून आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमधील फोटो...