आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनूने शेअर केला अजानचा व्हिडिओ, आता काही प्रोड्यूसर त्याला धमकी देतील : KRK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धार्मिक स्थळांवर लावल्या जाणा-या लाउडस्पीकरच्या विरोधामुळे सोनू निगम सध्या चर्चेत आहे. सोनूने आज पुन्हा या संदर्भात एक ट्वीट केलेय. आज पहाटे सोनूने त्याच्या घरातून ऐकू येणाऱ्या अजानचा एक व्हिडिओ ट्‍वीटरवर अपलोड केलाय. हा व्हिडिओ शेअर करतानाच त्यानं 'गुड मॉर्निंग इंडिया' असं ट्विट केलं आहे. ज्यानंतर अॅक्टर कमाल राशिद खान (KRK) म्हणाला, "आता काही सी ग्रेड प्रोड्यूसर सोनूला बायकॉटची धमकी देतील. जर मी एखादी फिल्म बनवली तर सर्व गाणे सोनू निगमलाच गायला देईल." 17 एप्रिल रोजी सोनूने मशिदीवरील भोंग्याद्वारे होणाऱ्या अजानवर आक्षेप नोंदविणारे ट्‍वीट केले होते.
 
काय म्हणाला होता सोनू निगम..?
'मी मुस्लिम नाही, तरीही रोज सकाळी अजानाच्या आवाजाने झोपमोड होते. ही बळजबरी कधी थांबणार? अशा शब्दांत सोनूने ट्‍वीट करून आपले मत व्यक्त केले होते. भारतात बळजबरी नागरिकांवर धर्म थोपविला जात असल्याचे सांगत सोनूने चार ट्वीट केले होते.
 
ट्वीट्समधील मजकूर असा होता...  
- ''देवा सर्वांना खूश ठेवो, मी मुस्लिम नाही आणि मला अजानच्या आवाजाने सकाळी जागावे लागते. भारतात धर्म थोपवणे कधी बंद होणार ते कळत नाही."
- दुसऱ्या ट्वीटमध्ये सोनूने लिहिले, ''मोहम्मदांनी इस्लाम बनवला त्यावेळी वीज कुठे होती. मग आता आरडाओरडा का?
- सोनू एवढ्यावरच थांबला नाही, सकाळी सकाळी मंदिर आणि गुरुद्वाऱ्यात होणाऱ्या किर्तनावरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही मंदिर अथवा गुरुद्वाऱ्यातील लोकांनीही अशा प्रकारे वीजेचा वापर करून लोकांना झोपेतून उठवू नये, असे सोनूने पुढच्या ट्वीटमध्ये म्हटले.
- यानंतर सोनूने चौथे ट्वीट केले त्यात लिहिले, ही सर्व निव्वळ गुंडागर्दी आहे.
 
फतव्या विरुध्द केले मुंडण
अजानमुळे झोपमोड होत असल्याचे ट्‍वीट करत मशीद, मंदिर व गुरुद्वारांवरील लाऊडस्पीकरला गायक सोनू निगमने विरोध दर्शवला होता. त्याविरुद्ध पश्चिम बंगाल अल्पसंख्याक युनायटेड कौन्सिलचे उपाध्यक्ष मौलवी सय्यद शहा आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमचे डोके भादरून त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालणाऱ्याला दहा लाख रुपये देऊ, असा फतवा काढला होता. सोनू निगमने बुधवारी स्वतःचे मुंडण करून घेत आता मौलवीकडे हे दहा लाख रुपये मागितले होते.
 
अहमद पटेल यांचे ट्वीट
अजान महत्त्वाचे, लाउडस्पीकर नाही; सोनू निगमनंतर अहमद पटेल यांनी केले होते ट्वीट
गायक सोनू निगम याने अजानवर केलेल्या वादग्रस्त 'ट्वीट' नंतर सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी ट्वीट केले होते. अजान हे नमाज पठणाचा महत्त्वाचा भाग आहे, पण, आजच्या आधुनिक युगात लाऊडस्पीकर गरजेचे नाही,' असे स्पष्ट मत पटेल यांनी व्यक्त केले होते.

 
बातम्या आणखी आहेत...