आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूसमयी गर्भवती होती \'सुर्यवंशम\'ची ही अभिनेत्री, घरच्यांना मिळाला नव्हता मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरूः 'सुर्यवंशम' (1999) हा चित्रपट प्रदर्शनानंतर भलेही फ्लॉप झाला असेल पण आज तो सर्वात चर्चित सिनेमांपैकी एक आहे. सेटमॅक्स वाहिनीवर आठवड्यातून एकदा तरी हा सिनेमा दाखवला जातो. या सिनेमाच्या रिलीजला नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. सिनेमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या परिचयाचे आहे. यापैकीच एक पात्र होते अभिनेत्री सौंदर्याचे. या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीने या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. पण सिनेमाच्या रिलीजच्या अवघ्या पाच वर्षांत या अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू झाला. अतिशय कमी वयात सौंदर्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला. मृत्यूसमयी सौंदर्या गर्भवती होती. तिच्या घरच्यांना तिचे शवही मिळाले नव्हते. 

असा घडला होता भयावह अपघात...  
- 17 एप्रिल 2004 रोजी सौंदर्या भारतीय जनता पार्टी आणि तेलुगू देसम पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी करिमनगर येथे जात होती.
- सकाळी 11.05 वाजता फोर सीटर प्रायवेट एअरक्राफ्टने बंगळुरूच्या जक्कुर एअरफिल्ड येथून उड्डाण केले आणि जेव्हा ते 100 फूट वरती गेले तेव्हा ते क्रॅश झाले.
- एअरक्राफ्टमध्ये सौंदर्याव्यतिरीक्त तिचा भाऊ अमरनाथ, हिंदू जागरण समितीचे सेक्रेटरी रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते. दुर्घटनेत या चौघांचाही मृत्यू झाला.
 
मृत्यूसमयी केवळ 31 वर्षाची होती सौंदर्या...
- मृत्यूसमयी सौंदर्या केवळ 31 वर्षांची होती. 
- सौंदर्याचे पूर्ण नाव सौंदर्या सत्यनारायण असे होते. 18 जुलै 1972 रोजी कर्नाटकच्या कोलार येथे जन्मलेल्या बिझनेसमन आणि कन्नड चित्रपटांचे लेखक एस. नारायण यांच्या घरी झाला.
- मृत्यूच्या केवळ वर्षभराअगोदर सौंदर्याने सॉफ्टवेअर इंजिनीअर जी. एस. रघूसोबत विवाह केला होता. 

पुढील स्लाईडमध्ये वाचा, एक्सपोज न करण्याच्या अटीवर आली होती सिनेसृष्टीत...  
बातम्या आणखी आहेत...