आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्टार रजनीकांतची ही मुलगी घेणार नव-यापासून काडीमोड, 2010मध्ये झाले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 2016 या वर्षाची सुरुवातच मुळात बॉलिवूड स्टार्सच्या घटस्फोट आणि ब्रेकअप्सनी झाली. अशातच आता पुन्हा एका सेलिब्रिटीच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या ही तिचा पती अश्विन रामकुमारपासून वेगळी होणार आहे. त्यांच्यात काही वाद असल्याने ते घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले आहे. रजनीकांत यांना दोन मुली असून सौंदर्या ही दुसरी मुलगी आहे.

सौंदर्याने ऐकला नाही वडिलांचा सल्ला...
- डेक्कन क्रॉनिकलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, रजनीकांत यांची धाकटी कन्या सौंदर्याने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

- सौंदर्या आणि अश्विन रामकुमार या दोघांचं 2010 मध्ये म्हणजेच सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

- लग्नाच्या काही वर्षानंतर यांच्यात वाद सुरु झाले होते. शेवटी या दोघांनी आपआपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

- रजनीकांत हे काही कामासाठी अमेरिकेला गेले होते. अमेरिकेहून परतल्यानंतर ते सौंदर्या आणि अश्विन दोघांशीही बोलले. त्यांनी सौंदर्याला नाते सांभाळण्याचा सल्ला दिला. पण ती ऐकली नाही. सौंदर्या वेगळे होण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. म्हणून ती वडिलांबरोबर अमेरिकेला गेली नव्हती.
- खरंतर सौंदर्या आणि अश्विन लग्नाच्या चार वर्ष आधीपासून एकमेकांना ओळखत होते. अश्विन एक व्यावसायिक आहे. 2010 मध्ये सौंदर्या आणि अश्विन यांचे लग्न चेन्नईमध्ये झाले होते. गेल्यावर्षी मे मध्ये त्यांना एक मुलगा झाला. मुलाचे नाव वेद असे आहे.

- भारतातली पहिली मोशन कॅप्चर अॅनिमेटेड सिनेमा ‘कोचादैया’ बनवण्याचे श्रेय सौंदर्याला जाते. या सिनेमात रजनीकांत यांची मुख्य भूमिका होती.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सौंदर्या आणि अश्विन यांची निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...