Home »News» South Actor Huchcha Venkat Attempts Suicide By Drinking Phenyl

एकतर्फी प्रेमातून साऊथ अभिनेत्याचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 14:56 PM IST

मुंबई/बंगळुरु - साऊथ अभिनेता आणि यूट्युब स्टार हुच्चा वेंकटने रविवारी फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हुच्चाचे टीव्ही शोमधील एका सहभागी तरुणीवर प्रेम होते पण त्या मुलीच्या कुटुंबाने त्याला नकार दिल्याने वेंकटने त्याच्या फार्महाऊसवर फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वेंकटने रिअॅलिटी शो 'सुपर जोडी २' मध्ये काम केले आहे. यादरम्यान त्याचे या शोमधील सहभागी तरुणीवर प्रेम जडले. वेंकटने तो आत्महत्या करत असल्याचा एसएमएस मीडियाला केला होता.
- वेंकटने स्वतःहून मीडियाला एसएमएस करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले. सध्या त्याच्यावर उपचार चालु आहेत. पण उपचारादरम्यान वेंकट डॉक्टर आणि नर्स यांना कोऑपरेट करत नसल्याचे कळत आहे.
वेंकटने गर्लफ्रेंड रेश्मासोबत लग्न केले होते..
- वेंकटने त्याची लिव इन गर्लफ्रेंड रेश्माबरोबर लग्न केले होते. पण हे लग्न जास्तकाळ टिकले नाही आणि 3 वर्षानंतर 2010 साली या दोघांनी घटस्फोट घेतला.
पुढच्या स्लाईडवर वाचा, वेंकटच्या आत्महत्येवर रचना काय म्हणाली..

Next Article

Recommended