आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भावाला पाहायलाही गेला नाही हा अभिनेता, हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद - साऊथ अभिनेता भारत भुपतिराजू (46 वर्षे) याचे कार अपघातात निधन झाले. रविवारी ज्युबली हिल्स येथील महाप्रस्थानम येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तेथे त्याचा भाऊ आणि प्रसिद्ध अभिनेता रवी तेजा आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य पोहोचले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर रवी तेजा आणि त्याचे कुटुंबीयांना धक्का बसला आहे त्यामुळे कोणीच भारतच्या अंत्ययात्रेत गेले नाहीत. भावाची बॉडी घेण्यासाठीही गेला नाहीस रवी तेजा..
 
अपघातानंतर त्यांची बॉडी उस्मानिया जनरल हॉस्पीटल येथे पोस्टमार्टम करण्याकरता नेण्यात आली आणि त्यानंतर तेथीलच शवगृहात ठेवण्यात आली होती. शनिवारी २४ जून रोजी हैदराबादच्या आउटर रिंग रोडवर कोतवालगुडा येथे भारतची गाडी एका ट्रकला जाऊन धडकली. यावेळी त्याचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत शनिवारी शमशाबादपासून गचीबावली येथे जात होता. अजूनपर्यंत त्याचे लग्न झाले नव्हते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, फक्त रवी तेजाचा लहान भाऊ अंत्ययात्रेत पोहोचला..
बातम्या आणखी आहेत...