आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साऊथ अॅक्ट्रेस नमिताचे तिरुपतीमध्ये शुभमंगल, PHOTOS मध्ये पाहा मेंहदी ते लग्नापर्यंतचे विधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नविधीवेळी नमिता आणि वीरेंद्र चौधरी. - Divya Marathi
लग्नविधीवेळी नमिता आणि वीरेंद्र चौधरी.

मुंबई/चेन्नई - साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात हॉट अॅक्ट्रेसेस पैकी एक नमिता शुक्रवारी बोहल्यावर चढली. अॅक्टर-प्रोड्यूसर वीरा उर्फ वीरेंद्र चौधरीसोबत नमिता विवाहबद्ध झाली आहे. नमिता-वीराचे लग्न तिरुपती येथील विनायक नगरमधील इस्कॉन मंदिरात झाले. लग्नात नमिताने पिंक साडी नेसली होती. तर वीरा त्याच रंगाच्या शेरवाणीमध्ये होता. यावेळी अभिनेता शरत कुमार त्याची पत्नी राधिका देखील उपस्थित होते. 22 नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत सेरेमनी झाली होती. रिसेप्शन चेन्नईमध्ये होणार आहे. 

 

वीराने नमिताला असे केले होते प्रपोज... 
- नमिताला वीरावर त्याच्या प्रपोज करण्याच्या स्टाइलनेच फिदा झाली होती. हे तिने स्वतः एका मुलाखतीत कबूल केले आहे. 
- नमिताने सांगितल्यानुसार, वीरासोबत तिची भेट गेल्यावर्षी (2016) सप्टेंबरमध्ये झाली होती. तिचे बेस्ट फ्रेंड शशिधर बाबूने दोघांना इंट्रोड्यूस करुन दिले होते. 
- यानंतर 6 सप्टेंबर 2017 ला वीराने एका बीचवर रोमँटिंक अंदाजात नमिताला कँडल लाइट डिनरसाठी विचारणा केली होती. हे ऐकूनच नमिताला आनंद आणि आश्चर्य एकाचवेळी झाले होते. ती म्हणते, मी याची कधी आपेक्षाही केली नव्हती. 
- त्यानंतर मला जाणवले की हीच ती व्यक्ती आहे, जी तुला मनापासून प्रेम करते आणि ज्याची पहिली प्रियारिटी ही तू आहे. जेव्हा एखाद्यासाठी तुम्ही महत्त्वाचे होता, तेव्हा नक्कीच तुम्ही नशिबवान आहात, असे माननाऱ्यांपैकी एक नमिता आहे. 
- एका ठिकाणी नमिताने म्हटले होते, की मी स्वतःला नशिबवान समजते कारण वीरा माझ्या आयुष्यात आहे. 
- विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते शरत बाबूसोबत नमिताचे नाव जोडले गेले होते. 

बातम्या आणखी आहेत...