आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रभुदेवानंतर या व्यक्तीला डेट करत आहे नयनतारा, 2015 मध्ये झाली होती पहिली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या फोटोत प्रभुदेवासोबत नयनतारा. दुसऱ्या फोटोत बॉयफ्रेंड विग्नेश शिवनसोबत नयनतारा. - Divya Marathi
पहिल्या फोटोत प्रभुदेवासोबत नयनतारा. दुसऱ्या फोटोत बॉयफ्रेंड विग्नेश शिवनसोबत नयनतारा.

मुंबई/चेन्नई - साऊथची प्रसिद्ध अॅक्ट्रेस नयनतारा काही दिवसांपूर्वीच 33 वर्षांची झाली. तिच्या बर्थडेला तिचा बॉयफ्रेंड आणि डायरेक्टर विग्नेश शिवन यानेही तिला विश केले होते. विग्नेशने ट्विटरवर तिला शुभेच्छा देताना लिहिले होते,  Happy Birthday to a woman I really look upto Stay Bold stay beautiful jus keep creating that stunning story of what is #Nayanthara Proud of u as always!! विग्नेशच्या आधी नयनताराचे सुत डांसर अॅक्टर प्रभुदेवासोबत जुळले होते. दोघे लिव्ह इनमध्येही राहात होते. 

 

अवॉर्ड शोमध्ये रिलेशनशिपबद्दल जाहीर वाच्यता 

- विग्नेश आणि नयनतारा यांनी त्यांची रिलेशनशिपची अधिकृत घोषणा सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये केली होती. 
- दोघे रेड कार्पेटवर आल्यानंतर त्यांनी आपली रिलेशनशिप जगजाहीर केली होती. विग्नेश, नयनताराला प्रेमाने Thangamey म्हणतो. 
- तामिळ फिल्ममेकर असलेला विग्नेश सध्या अॅक्टर सूर्या आणि किर्ती यांना घेऊन 'थाना सुरेंद्र कोट्टम' फिल्ममध्ये बिझी आहे. ही फिल्म 2018 च्या जानेवारीमध्ये रिलीज होईल. 
- नयनतारा आणि विग्नेश यांनी 2015 मध्ये तामिळ फिल्म 'नानुम राउडी धान' मध्ये एकत्र काम केले होते. 

 

प्रभूदेवाने घेतला होता घटस्फोट 
- नयनतारा आणि प्रभुदेवा यांच्या अफेअरची टॉलिवूड मध्ये जोरदार चर्चा होती. 
- नयनतारासाठी प्रभुदेवाने त्याच्या पत्नीलाही सोडल्याचे म्हटले जाते. दोघे एकत्र राहात होते. प्रभुदेवाने पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर नयनतारानेही त्याला सोडल्याचे सांगितले जाते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा नयनताराचे काही निवडक फोटो... 

बातम्या आणखी आहेत...