आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिरो-हिरोईन्सच्या मानधनात भेदभाव का, अॅक्ट्रेसचा खडा सवाल- कोणाला 3 तर कोणाला 15Cr

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रकुलप्रीत सिंह आणि नयनतारा. - Divya Marathi
रकुलप्रीत सिंह आणि नयनतारा.

मुंबई/हैदराबाद - साऊथ अॅक्ट्रेस रकुलप्रीत सिंहने एका फिल्म प्रमोशन इव्हेंटमध्ये अॅक्ट्रेसेसला दिल्या जाणाऱ्या मानधनावर प्रश्न उपस्थित केला आहे. रकुलने साऊथची सुपरस्टार नयनताराचे उदाहरण देताना सांगितले, की ती कॉलिवूडची (तामिळ फिल्म इंडस्ट्री) सर्वात महागडी अभिनेत्री आहे. एका चित्रपटासाठी तिला फक्त 3 कोटी रुपये मानधन मिळते. तर दुसरीकडे, इंडस्ट्रीतील लीड अॅक्टरला एका फिल्मसाठी तब्बल 15 कोटी रुपयांपर्यंत दिले जातात. अॅक्टर आणि अॅक्ट्रेसमध्ये मानधनावरुन हा भेदभाव का होता, असा खडा सवाल रकुलने केला आहे. 

 

- रकुलप्रीतने म्हटले, की नयनतारा साऊथची सुपरस्टार आहे. ती बहुतेक सर्वच फिल्ममध्ये लीड अॅक्ट्रेसच्या भूमिकेत असते. तरीही अभिनेत्याला 15 कोटी आणि अभिनेत्रीची बोळवण फक्त 3 कोटींवर केली जाते. आम्ही कितीही सांगत असलो की अॅक्टर आणि अॅक्ट्रेसेस यांना समान दर्जा आहे. मात्र तरही ही इंडस्ट्री मेल डॉमिनेटिंग आहे. जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा अॅक्टर आणि अॅक्ट्रेसेसला दिल्या जाणाऱ्या मानधनातील अंतर ही दरी किती मोठी आहे हे सांगण्यास पुरेशी आहे.  

 

पुढील स्लाइड्सवर.... अखेर हिरोच्या तुलनेत हिरोईन्सला कमी मानधन का... 

बातम्या आणखी आहेत...