आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत सापडले होते या साऊथच्या सुपरस्टारचे लग्न, घडली होती गंभीर दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी लक्ष्मी प्रणतिसोबत, (L) 2009 मध्ये अॅक्सिडेंटमध्ये गंभीर जखमी झालेले ज्युनियर एनटीआर. लग्नाच्या एका विधीत लक्ष्मी प्रणती - Divya Marathi
पत्नी लक्ष्मी प्रणतिसोबत, (L) 2009 मध्ये अॅक्सिडेंटमध्ये गंभीर जखमी झालेले ज्युनियर एनटीआर. लग्नाच्या एका विधीत लक्ष्मी प्रणती
मुंबई/हैदराबादः साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (नंदमूरी तारक रामा राव) 20 मे रोजी 34 वर्षांचे झाले आहेत. 1983 साली हैदराबादमध्ये जन्मलेले ज्युनियर एनटीआर गतकाळातील अभिनेते आणि आंध्रप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे नातू आहेत.  
2010 मध्ये विजयवाडाचे वडील वकील सिंगुलुरी शांती प्रसाद यांनी ज्युनियर एनटीआर यांच्याविरोधात चाइल्ड मॅरेज अॅक्टअंतर्गत तक्रार दाखल केली होती. ज्युनिअर एनटीवर बिझनेसमन (तेलुगु चॅनलचे मालक) नर्ने श्रीनिवास राव यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी प्रणतीसोबत लग्न करत असल्याचे या वकिलांचे म्हणणे होते. या प्रकरणानंतरप्र णती 18 वर्षांची झाल्यानंतर 5 मे 2011 रोजी दोघांचे लग्न झाले होते. ज्युनियर एनटीआर आणि प्रणती या दाम्पत्याला आता एक मुलगा असून अभय राम हे त्याचे नाव आहे.

इलेक्शन कॅम्पनदरम्यान घडली होती गंभीर दुर्घटना...  
- 2009च्या जनरल इलेक्शनवेळी तेलुगुदेशम पक्षाच्या कॅम्पेननंतर हैदराबादला परत असताना ज्युनियर एनटीआर यांच्या कारला नलगोंडाच्या सूर्यापेट येथे गंभीर अपघात झाला होता.
- हा अपघात एवढा भयावह होता, की एनटीआर आणि त्यांचे काही मित्र कारमधून बाहेर फेकले गेले होते. त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचार करण्यात आले होते.

 
ज्युनियर एनटीआरच्या वडिलांनी दोनदा केले होते लग्न...
ज्युनियर एनटीआरचे वडील नंदमूरी हरिकृष्ण यांनी 1973 साली पहिले लग्न लक्ष्मी यांच्यासोबत झाले होते. त्यांना जानकी राम आणि कल्याण राम ही दोन मुले आणि सुहासिनी ही एक मुलगी आहे. त्यानंतर नंदमूरी यांनी शालिनी यांच्यासोबत दुसरे लग्न थाटले. या लग्नापासून त्यांना ज्युनियर एनटीआर हा मुलगा आहे. 

पुढील स्लाईड्सवर बघा, ज्युनियर एनटीआर आणि त्यांच्या फॅमिलीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...