आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीने केला खुलासा, ''आठव्या वर्गानंतर कळाले सेक्स म्हणजे काय?''

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलेंडर लाँच करताना सनी - Divya Marathi
कॅलेंडर लाँच करताना सनी
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओन सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सनी चर्चेत आली आहे. यावेळी ती सुरक्षित सेक्स आणि कंडोमविषयी उघडपणे आपले मत व्यक्त केले आहे.
मॅनफोर्स कंडोमच्या कॅलेंडर लाँचच्या निमित्ताने सनीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, "माझा सुरक्षित सेक्सवर विश्वास आहे. कारण असे केल्याने तुम्ही संसर्गजन्य आजार, नको असलेल्या गर्भधारणेपासून स्वतःचा बचाव करु शकता."
सनी पुढे म्हणाली, ''सुरक्षित सेक्स आणि कंडोमला प्रत्येकाने महत्त्व दिले पाहिजे. शाळा किंवा मित्रांकडून सेफ सेक्सविषयी माहिती मिळत नाही.'' सनीच्या मते, कंडोम खरेदी करताना लाज वाटायला नको. सनीने खुलासा केला, की तिला आठव्या वर्गानंतर सेक्स म्हणजे काय, हे कळायला सुरुवात झाली होती.
सनी आता 'तेरा इंतजार' नावाच्या नवीन सिनेमात झळकणारेय. ऑगस्ट महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून यामध्ये अभिनेता अरबाज खान सनीसोबत काम करणारेय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, कॅलेंडर लाँचवेळी क्लिक झालेली सनीची खास झलक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...