आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Spotted: लग्नानंतर शाहिद-मीराने कूल लूकमध्ये केली आउटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे न्युली मॅरिड कपल शाहिद कपूर आणि मीरा राजपूत अलीकडेच मुंबईतील वांद्रा परिसरात हातात हात घालून फिरताना दिसले. यावेळी ही जोडी कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसली. त्यांच्या आउटफिटवरुन हे दोघेही जिममधून परतल्याचे दिसत होते. यावेळी शाहिद ग्रे जॅकेट आणि ब्लॅक लोअरमध्ये तर मीरा ब्लॅक टीशर्ट आणि ब्लू ब्लॅक लोअरमध्ये दिसली. दोघांचाही हा लूक कूल होता.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत अलीकडेच म्हणजे 7 जुलै रोजी लग्नगाठीत अडकले. 12 जुलै रोजी मुंबईतील हॉटेल पॅलेडियम येथे त्यांचे ग्रॅण्ड रिसेप्शन झाले. रिसेप्शनला अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर, कंगना रनोट, कृती सेननसह बी टाऊनचे अनेक सेलेब्स जमले होते.
पुढे पाहा, वांद्र्यात क्लिक झालेली शाहिद-मीराची लग्नानंतरची पहिली झलक...