(सोनाक्षी सिन्हा, खुशी कपूर, श्रीदेवी, जान्हवी कपूर)
मुंबईः गुरुवारी रात्री अभिनेत्री श्रीदेवी दोन्ही मुली जान्हवी आणि खुशीसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. श्रीदेवीसोबत तिचे पती आणि निर्माते बोनी कपूरसुद्धा हजर होते. ही कपूर फॅमिली आयफा अवॉर्ड्स सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मलेशियातील कुआलांलपूरला रवाना झाली.
सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन, मलायका अरोरा खान, नेहा धुपिया, अनिल कपूर, दीया मिर्झा, सोनू सूद, दिग्दर्शक विकास बहलसह अनेक स्टार्स मुंबई विमानतळावरुन आयफासाठी रवाना होताना दिसले.
16 वा आयफा अवॉर्ड्स सोहळा 5 ते 7 जून याकळात मलेशियातील कुआलालंपुर येथे पार पडणार आहे. अवॉर्ड नाइट अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह होस्ट करणार आहेत. तर हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि शाहिद कपूर अवॉर्ड शोमध्ये आपल्या परफॉर्मन्सचा जलवा दाखवणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, एअरपोर्टवर क्लिक झालेली स्टार्सची छायाचित्रे...