आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधून अचानक गायब झाली होती 'जुम्मा-चुम्मा' गर्ल, आता दिसते अशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अमिताभ बच्चन यांच्या 'हम' सिनेमातील 'जुम्मा चुम्मा दे दे' या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री किमी काटकर दीर्घ काळानंतर सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसली. बुधवारी ती अनु मल्होत्राच्या आर्ट एक्झिबिनशनमध्ये सहभागी झाले होती. एकेकाळी आपल्या बोल्ड रुपासाठी ओळखली जाणारी किमी या इव्हेंटमध्ये अतिशय साध्या लूकमध्ये दिसली. एवढ्या वर्षांत तिचा लूक एवढा बदलाल, की यावेळी तिला ओळखणेही कठीण झाले होते.

'टार्जन'च्या बोल्ड सीन्सने मिळवून दिली लोकप्रियता
किमी काटकरचे फिल्मी करिअर 80च्या दशकापासून 1990च्या सुरुवातीच्या काही वर्षांपर्यंत चालले. किमी काटकरने 1985मध्ये 'पत्थर दिल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. याचवर्षी ती 'टार्जन' सिनेमात झळकली. 'टार्जन'मध्ये किमीच्या अपोझिट हेमंत बिर्जे होता. सिनेमाच्या बोल्ड सीन्सने किमीला खूप लोकप्रियता मिळवून दिली. तिच्या करिअरमध्ये 'वर्दी', 'मर्द की जुबान', 'मेरा लहू', 'दरिया दिल', 'गैर कानूनी', 'जैसी करनी वैसी भरनी', 'शेरदिल' आणि 'जुल्म की हुकूमत' सिनेमे विशेषत: सामील आहेत.

किमीला फिल्मी इंडस्ट्रीची रीत पसंत नव्हती
किमी काटकरला फिल्मी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची पध्दत मुळीच पसंत नव्हती. तिने बॉलिवूडला राम राम ठोकण्यापूर्वी सांगितले होते, 'मी फिल्म इंडस्ट्रीमधून अस्वस्थ होऊन जात आहे.' किमीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींसोबत होणा-या शोषणावरसुध्दा प्रश्न उपस्थित केले होते. किमीने सांगितले होते, 'पुरुष प्रधान समाजात महिला कलाकारांच्या तुलनेत अभिनेत्यांना उच्च देत असल्याने ती त्रस्त झाली आहे आणि त्यामुळे ती बॉलिवूडचा निरोप घेत आहे.'
अचानक फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाली किमी
किमी काटकर जितक्या दिवस फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहिली, तिची प्रतिमा बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणूनच राहिली. 1990नंतर ती अचानक सिनेसृष्टीतून बाहेर पडली.

करिअरमधील चढ-उतारावेळी पुण्याच्या फोटोग्राफरसोबत केले लग्न
करिअरमध्ये चढ-उतार चालू असताना किमी काटकरने पुण्याचा फोटोग्राफर आणि जाहिरात निर्माता शांतनु शोरेसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने बॉलिवूडमधून काढता पाय घेतला. किमी काटकर काही वर्षांपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्येसुध्दा राहिली. सध्या ती पती शांतनु आणि मुलगा सिध्दार्थसोबत पुण्यात राहत आहे.
किमीप्रमाणेच 80च्या दशकातील अनेक अभिनेत्री अचानक पडद्यावरुन गायब झाल्या होत्या. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आता कुठे आहेत 80च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...