आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार संजय दत्त-श्रीदेवी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय दत्त आणि श्रीदेवी 25 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी दोघांनी 1993 मध्ये यश जोहरच्या 'गुमराह'मध्ये काम केले होते. एका रिपोर्टनुसार, करण जोहरचे प्रॉडक्शन हाऊस पार्टिशनवर एक चित्रपट बनवत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन करणार आहेत. अर्जुन आणि आलिया स्टारर '2 स्टेट्स' देखील अभिषेक वर्मन यांनी तयार केला होता. 

हा चित्रपट करण जोहरसाठी खूप खास असल्याची चर्चा इंडस्ट्रीमध्ये आहे. कारण की, ही आयडिया त्यांच्या वडिलांची होती. रिपोर्टनुसार सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन आणि आलिया भट्ट यांना आधीच चित्रपटासाठी निवडण्यात आले आहे. श्रीदेवीनेदेखील यासाठी होकार दिला आहे. आता संजय दत्तला विचारण्यात आले आहे. 

संजय चित्रपटाला नकार देणार नाही, अशी चर्चा होत आहे, असे झाले तर श्रीदेवी आणि संजय दत्त 25 वर्षांनंतर एकत्र पाहायला मिळतील. दोघांच्या चाहत्यांना त्यांना पडद्यावर पाहणे सुखद अनुभव असेल. 
बातम्या आणखी आहेत...