आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीने नाकारल्याने राम्याला मिळाली 'शिवगामी'ची भूमिका, हे आहे त्यामागचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बाहुबली चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटाचा खरा हिरो कोण अशी चर्चा होतेच. त्यावर बाहुबली, कटप्पा, देवसेना अशा नावांची आवर्जुन चर्चा होते. पण शिवगामीदेखिल या यादीतील महत्त्वाची दावेदार आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. राम्याने केलेली शिवगामीची भूमिका दुसरी कोणीही इतक्या चांगल्या प्रकारे साकारू शकली नसती असे चित्रपट पाहिल्यानंतर वाटते. पण राम्याला ही भूमिका मिळाली ती श्रीदेवीच्या नकारामुळे. राजामौली यांनी श्रीदेवीला या भूमिकेसाठी विचारणा केली होती. पण काही कारणास्तव तसे झाले नाही. पाहुयात काय आहे ते नेमके कारण. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवीने ही भूमिका करावी अशी बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांची अगदी मनापासूनची इच्छा होती. त्यासाठी राजामौलींनी जेव्हा याबाबत श्रीदेवीकडे विचारणा केली तेव्हा श्रीदेवीनेही सकारात्मक भूमिका दाखवली. पण तिने मागितलेली फीस जास्त होती. श्रीदेवीने या चित्रपटासाठी 6 कोटी रुपयांची मागणी केली होती, असे समोर आले आहे. पण आधीच चित्रपटाचे बजेट वाढत चालले होते, त्यामुळे राजामौलींनी श्रीदेवींना भूमिका देण्याचा विचार बदलला.
 
राम्यानी घेतले 2.5 कोटी
श्रीदेवीच्या मागणीनंतर राजामौली आणि निर्मात्यांनी श्रीदेवीचा विचार सोडला आणि राम्याशी संपर्क केला. राम्याने अत्यंत उत्कृष्ट ऑडिशन दिले आणि शिवगामीसाठी योग्य असल्याचे सर्वांना पटले. राम्याने या चित्रपटासाठी 2.5 कोटी रुपये घेतल्याचे समोर आले आहे. 

बाहुबली सोडला पुली स्वीकारला
श्रीदेवीने फीसच्या कारणावरून बाहुबली चित्रपट सोडला. त्यावेळी तिच्यासमोर पुली चित्रपटाचीही ऑफर होती. यातही तिची ऐतिहासिक भूमिका होती. त्यामुळे श्रीदेवीने बाहुबली सोडला आणि पुली चित्रपट स्वीकारला. 
 
पुढे पाहा, बाहुबलीतील राम्या आणि पुलीतील श्रीदेवीचा लूक..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...