आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 कोटी फीस घेणारी पहिली अॅक्ट्रेस होती ही अॅक्ट्रेस, सलमानसुद्धा वाटायची हिची भीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात झाला. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून श्रीदेवीने अभिनयाचा श्रीगणेशा केला. बालकराराच्या रुपात 1976 मध्ये आलेल्या 'मुंदरु मुदिची' या सिनेमात श्रीदेवी झळकली होती. तीन दशकाच्या फिल्मी करिअरमध्ये श्रीदेवीने जवळजवळ 200 फिल्म्समध्ये काम केले. हीरोईनच नव्हे हीरोसुद्धा घाबरायचे हिच्यासोबत काम करताना...

1979 मध्ये 'सोलहवां सावन' या सिनेमाद्वारे श्रीदेवीने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा अपयशी ठरला. त्यानंतर काही काळ ती बॉलिवूडमध्ये झळकली नाही. तीन ते चार वर्षांनंतर म्हणजे 1983 मध्ये श्रीदेवीने हिम्मतवाला या सिनेमाद्वारे पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. 80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये श्रीदेवीची जादू अशी काही चालली, की हीरोईनच नव्हे तर हीरोंनासुद्धा तिच्यापासून इनसिक्युअर वाटू लागले.

1 कोटी फिस घेणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री आहे श्रीदेवी...
बॉलिवूडमध्ये नेहमीच अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना जास्त मानधन मिळत असते. मात्र 80 आणि 90 च्या दशकात निर्माते-दिग्दर्शक श्रीदेवीला सिनेमे हिट करण्याचा मोठा फॉर्मुला समजत असे. याच कारणामुळे त्याकाळात एक कोटी रुपये मानधन घेणारी श्रीदेवी पहिली अभिनेत्री आहे.

सलमानसुद्धा घाबरायचा श्रीदेवीला...
आज बॉलिवूडमध्ये सलमानचा दबदबा आहे. मात्र एका काळ असा होता, जेव्हा स्वतः सलमानसुद्धा श्रीदेवीसोबत काम करायला घाबरत असे. एका मुलाखतीत स्वतः सलमानने कबुली दिली होती, की त्याला श्रीदेवीसोबत काम करायची भीती वाटायची. याचे कारण म्हणजे श्रीदेवीसमोर लोक इतर कलाकारांना फारसे महत्त्व देत नसे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, श्रीदेवीसोबतची सलमानची निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...