आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SRK And Kajol Recreate The Iconic DDLJ Poster After 20 Years

‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ला 20 वर्षे पुर्ण, शाहरुखने घेतले काजोलला उचलून, फोटो शेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडच्या एव्हरग्रीन सिनेमांच्या यादीत सामील असलेल्या दिग्दर्शक आदित्य चोप्रांच्या 'दिलवाले दुल्हनिया लें जाएंगे' या सिनेमाच्या रिलीजला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचेच औचित्य साधत या सिनेमातील लीडिंग जोडीने आपल्या सिनेमांच्या आठवणींना उजाळा देत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोत ‘DDLJ’ चा हीरो अर्थातच अभिनेता शाहरुख खानने अभिनेत्री काजोलसोबत अगदी
तीच पोज दिली आहे, जी सिनेमाच्या पोस्टवर दिसतेय. अगदी त्याच स्टाईलमध्ये शाहरुखने काजोलला खांद्यावर उचलेल आहे. हा फोटो ट्विटरवर पोस्ट करुन शाहरुखने ट्विट केले, ‘Want to thk Team Rohit Shetty & Red Chillies for doing this last minute.All looked happy that I picked Kajol again’
शाहरुखची होती कल्पना
शाहरुख आणि काजोलचे हे छायाचित्र त्यांच्या आगामी 'दिलवाले' या सिनेमाच्या सेटवर क्लिक करण्यात आले आहे. ‘DDLJ’च्या पोस्टवर असलेल्या पोजमधील सारखा फोटो क्लिक करण्याची आयडिया शाहरुखची होती. ‘20 yrs of DDLJ round the hour now…hmmm..Kajol & me together doing another Dilwale rite now.Should do a pic with her!’
'दिलवाले'च्या सेटवर ‘DDLJ’चे सेलिब्रेशन
शाहरुख-काजोलने 'दिलवाले' या सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत मिळून ‘DDLJ’ला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक जंगी सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओसुद्धा लवकरच ट्विटरवर अपलोड केला जाणार आहे. याची माहिती स्वतः शाहरुखने दिली, ‘Celebrated enough tonite with Dilwale team.But amidst mad shooting Rohit has a made a video for u all for DDLJ. Yrf will upload it soon.’
Yrf ने शेअर केले 3 व्हिडिओ
यशराज फिल्म्सने या सिनेमाच्या मेकिंगचे तीन व्हिडिओ यू-ट्युबवर शेअर केले आहेत. यामध्ये शूटिंगच्या काळातील रंजक किस्से बघायला मिळतात.
20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘DDLJ’ नंतर शाहरुखला इंडस्ट्रीच्या किंग ऑफ रोमान्सची पदवी मिळाली होती. या सिनेमाने शाहरुख-काजोलला इंडियन सिनेमातील एव्हरग्रीन जोड्यांच्या यादीत सामील केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शाहरुखचे Tweets…