आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SRK Said We Must Support Modi Nation Chose Him With Majority

शाहरुख म्‍हणाला मोदी महान आहेत, माझ्यासारखा दुसरा देशभक्‍तही नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व लोकांनी समर्थन करायला हवे, असे अभिनेता शाहरुख खानने म्‍हटले आहे. कारण या देशातील लोकांनीच त्‍यांना मेजॉरिटीने निवडले आहे, असेही शाहरूख म्‍हणाला. असहिष्‍णूतेबाबतच्‍या वक्‍तव्‍याला लोकांनी चुकीच्‍या अर्थाने घेतल्‍याचेही त्‍याने सांगितले. आणखी काय म्‍हणाला शाहरूख....
- शाहरुख म्‍हणाला- ''माझ्याएवढा मोठा देशभक्‍त दुसरा होऊ शकत नाही आणि ही बाब
मी शेवटची सांगत आहे.''
- शाहरुखचा 'फॅन' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला.
- शाहरुखने इंडिया टीव्‍हीच्‍या ‘आप की अदालत’मध्‍ये मोदींबाबतच्‍या प्रश्‍नांना उत्‍तरे
दिली. एका प्रश्‍नावर तो म्‍हणाला, ''मला एक बाब स्‍पष्‍ट करायची आहे. जेव्‍हा आपण
देशाचा नेता निवडतो. तो कोणीही असो, नरेंद्र मोदींसारखा महान व्‍यक्‍ती का असेना,
आपण त्‍यांना सपोर्ट करायला हवे. देशातील लोकांनी त्‍यांना मेजॉरिटीने निवडले आहे.
त्‍यांना सपोर्ट केल्‍याने देश प्रगती साधू शकेल.''
- “ मी राजकारणी नाही पण माझे मित्र सर्वत्र आहेत.”
- “ असहिष्‍णूतेवर मी केलेल्‍या वक्‍तव्‍याचा चुकीचा अर्थ घेण्‍यात आला. मी युवकांना
एवढेच म्‍हटले होते. रिलीजन, कास्ट आणि कलरच्‍या आधारावर भेदभाव होऊ नये.”
- “मला या देशानेच सर्वकाही दिले आहे. माझे वडील अत्‍यंत कमी वयात स्‍वातंत्र्य
सैनिक होते.”
माझे कुटुंब मिनी इंडिया आहे - शाहरुख
- शाहरुख म्‍हणाला, “माझे कुटुंब मिनी इंडिया आहे. पत्नी गौरी हिंदू आहे. मी जन्‍मानेच
मुस्‍लीम आहे. तीन मुलं आहेत ते तीन धर्मांना मानतात. त्‍यामुळे मी देशाबाबत असा
कसा विचार करेल.”
- “सोशल मीडियावर माझ्याबाबत येणा-या कमेंट या मला रडवणा-या आहेत. मी किती
वेळा सांगू की मी देशभक्‍त आहे. लहान बाबींवरून असे वाद व्‍हायला नको.”
- “भारत जगातील सर्वात मोठा देश आहे. हा सर्वात सुरक्षित आणि सुंदर देश आहे.”
भारताने भरभरून दिले....
- तो म्‍हणाला, '' माझा नवीन चित्रपट ‘फॅन’ हिट होवो अथवा फ्लॉप. मी शेवटचे सांगू
इच्‍छितो माझ्यासारखा मोठा देशभक्‍त या देशात दुसरा कोणी नाही.''
- '' आपला देश, आपली जन्‍मभूमि भारत माता आहे. मला भारताएवढे इतर कोण्‍या
देशाने भरभरून दिले नाही.''
पुढील स्‍लाइडवर वाचा, या वक्‍तव्‍यामुळे शाहरुख सापडला होता वादात....