आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive:शाहरूखचे पुन्हा होणार Operation, गुडघ्याच्या दुखण्याने SRK बेजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरूख खान आणि रोमँस हे जसं गेल्या दोन- अडीच दशकातलं घट्ट नातं झालंय. तसंच नातं शाहरूख खानचं त्याच्या दुखण्यांशी, आपघातांशी आणि त्यामूळे होणा-या सर्जरीशी सूध्दा झालंय. शाहरूख खानच्या गेल्या २४ वर्षांत १२ सर्जरी झाल्यात. त्यामूळे शाहरूख हा बॉलीवूडमधला सगळ्यात जास्त ऑपेरशन झालेला स्टार असावा.
शाहरूख खानचं नवीन वर्षात आता अजून एक ऑपरेशन होणार आहे. किंग खानच्या ‘दिलवाले’ चित्रपटाच्या ‘गेरूआ’ गाण्याच्या चित्रीकरणावेळी त्याच्या डाव्या गुडघ्याला जबर मार लागला. त्यानंतर २१ मे २०१५ ला शाहरूखचं मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं. पण तरीही आजही त्याला चालताना खूप त्रास होतोय. दुखणं बरं न झाल्याने आता त्याच्या गुडघ्याच्या वाटीचीं पून्हा सर्जरी करावी लागणार आहे.
Divyamarathi.com ला मिळालेल्या ह्या बातमीला दूजोरा देत किंग खानने स्वत: ह्याविषयी खुलासा केला. “हो, माझं पून्हा एकदा ऑपरेशन करावं लागणार आहे. काय करू, आता मला पडण्या-धडण्याची आणि सर्जरी करण्याची जणू सवयच लागलीय. ‘दिलवाले’चं ‘गेरूआ’ गाणं जेव्हा आम्ही बेल्गेरियात चित्रीत करत होतो. त्यावेळी झालेल्या दुखापतीवर मी मुंबईत आल्यावर एक छोटीशी सर्जरी झाली खरी. पण त्यानंतरही माझ्या डाव्या गुडघ्याची वाटी ठिक झाली नाही. सध्या मी दुखणं अंगावर काढतोय. कारण माझ्या ‘दिलवाले’ चित्रपटाचं प्रमोशन चाललंय. त्यानंतर माझ्या ‘रईस’ चित्रपटाचंही काम बाकी आहे. ‘रईस’चे काही एक्शन सिक्वेन्सेस आणि गाणी राहिलीयत. ते काम महिन्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर कदाचित जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका मोठ्या सर्जरीला मला सामोरे जावे लागेल.”
बल्गेरियात असताना शाहरूखला इजा झाल्यावर त्याची काजोलच्या आईने, अभिनेत्री तनुजानी खूप काळजी घेतली. शाहरूख सांगतो, “तनुजा आँटी त्या चित्रीकरणावेळी बल्गेरियातच आमच्यासोबत आली होती. त्यांच्याकडे कोणते तरी आयुर्वेदिक तेल होते. त्या तेलाने त्या रोज रात्री मला मॉलिश करायच्या. कधी कधी तर चित्रीकरण आटपून मला हॉटेलवर यायला खूप उशीर व्हायचा. रात्री दिड-दोन वाजायचे. पण त्या जाग्याच असायच्या. माझ्या गुडघ्याला मालिश केल्याशिवाय काही झोपायच्या नाहीत.“
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शाहरूख खानच्या गेरूआ गाण्याचे फोटो