आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मन्नत\' बाहेर उसळली चाहत्यांची गर्दी, शाहरुखने घेतला Selfie

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान
मुंबई- 2 नोव्हेंबरला 50वा वाढदिवस साजरा करत असलेला सुपरस्टार शाहरुख खानने रविवारी (1 नोव्हेंबर) रात्री चाहत्यांची भेट घेतली. एसआरकेच्या घराबाहेर (मन्नत) हजारो चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. घराबाहेर उभ्या चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुख मन्नतच्या बाल्कनीत आला आणि हात जोडून सर्वांना अभिवादन केले.
एसआरकेने चाहत्यांसोबतचा सेल्फी फेसबुकवर शेअर केला. फोटो शेअर करून त्याने लिहिले, 'Right now so humbled by the attention & love being given to my Birthday. Didn’t ever realise living will be so beautiful. Thanks all.'
रविवारी रात्रीपासून आतापर्यंत चाहत्यांची गर्दी शाहरुखच्या मन्नत बाहेर दिसते. बर्थडेच्या खास निमित्तावर शाहरुखच्या 'फॅन' या आगामी सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 18 डिसेंबरला शाहरुखचा 'दिलवाले' रिलीज होत आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात एसआरकेची जोडी काजोलसोबत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वाढदिवासाच्या दिवशी चाहत्यांना भेटताना शाहरुख...