आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SRK\'s Family Celebrates His B\'day,Film Fans Second Teaser Out On His B\'day

शाहरूख खानला मिळालं कुटूंबाकडून सरप्राइज, SRKच्या B’dayला आला FANचा second teaser

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग खान आज ५० वर्षाचा होतोय. त्यानिमित्ताने शाहरूख खानच्या कुटूंबाने त्याला रात्री १२ वाजता सरप्राइज दिले. गौरी खानने शाहरूख खानसाठी केक मागवला. आणि आर्यन, सुहानासह संपूर्ण कुटूंबाने शाहरूख खानचा वाढदिवस साजरा केला.
आता दिवसभर किंग खानचे अभिष्टचिंतन करण्यासाठी त्याच्या हितचिंतकांची रिघ लागेली असेल. त्याचे Fans त्याच्यासाठी काही ना काही भेटवस्तू दिवसभर आता पाठवतीलच. पण यंदा आपल्या चाहत्यांना एका आगळ्या पध्दतीने सरप्राइज करण्याचे बहूधा किंग खानने ठरवले आहे.
यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला आणि मनिष शर्मा दिग्दर्शित शाहरूख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाचा दूसरा टिझर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच युट्यूबवरून रिलीज करण्यात आलेला आहे. ‘फॅन’ चित्रपटात SRK हा स्वत:चाच फॅन दाखवण्यात आलाय.
आर्यन खन्ना ह्या सुपरस्टारच्या भूमिकेत आपल्याला शाहरूख खान दिसणारच आहे. पण त्याचा फॅन गौरवच्या भूमिकेतही आपल्याला शाहरूख दिसेल. शाहरूख खान ह्या चित्रपटात स्वत:चाच लूक-अ-लाइक बनलेला आहे. गौरव आपला आवडता हिरो आर्यन खन्नाचा लहानपणापासूनच डाय-हार्ड फॅन असतो. त्याचे छोट्या-मोठ्या आकाराचे फोटो जमा करण्यापासून, ते त्याच्याविषयी कोणी वाईट बोललं तर मारामारी करण्यापर्यंत आणि त्याची स्टाइल मारण्यापर्यंत हरत-हेने तो आर्यन खन्नाची भक्ती करत असतो. त्याला एकदातरी भेटावं अशी गौरवची इच्छा असते.
चित्रपटात शाहरूख खानचे त्याच्या तारूण्यातले फोटो, त्याने मुलाखती दिलेले व्हिडीयो दाखवण्यात आले आहेत. शाहरूख खानला VFXने २० वर्षाचा तरूण गौरव दाखवण्यात आलंय. त्यामूळे ह्या टिझरमध्ये VFXची ही कमाल पाहिल्यावर शाहरूख खानच्या Fansची आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच चाळवली असणार.
Fan चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, लंडन, दिल्लीमध्ये झाले आहे. हा चित्रपट १५ एप्रिल २०१५ला रिलीज होणार आहे. मात्र यंदा आपल्या आयुष्याचं अर्धशतक पूर्ण करणा-या शाहरूख खानचा हा टिझरमध्ये त्याच्या फॅन्ससाठी आनंदाची पर्वणी असेल, हे नक्कीच.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शाहरूख खानच्या फॅन चित्रपटाचा टिझर