आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First look: Raeesचा रिलीज झाला टिझर, पाहा SRK विकतोय दारू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रईस' चित्रपटाची दोन पोस्टर्स
पुढच्या वर्षीच्या ईदला रिलीज होणा-या शाहरूख खानच्या ‘रईस’ चित्रपटाचा फस्ट लूक शाहरूखने आपल्या चाहत्यांसाठी यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर रिव्हील केला आहे. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ ह्या चित्रपटासोबत शाहरूखच्या ‘रईस’ चित्रपटाचा फस्ट लूक टिझर दिसणार आहे. पण त्याही आधी आपल्या चित्रपटाविषयीची उत्सुकता चाळवण्यासाठी शाहरूखने चित्रपटाची दोन पोस्टर्स आणि पाठोपाठ टिझर अनविल केला आहे.
ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना हे सरप्रइज देताना शाहरूखने ‘केम छो मजामा’ असा प्रश्नही विचारलाय. शाहरूख खानच्या एका पोस्टरमध्ये त्याने पांढ-या रंगाचा शर्ट घातलाय, तर दुस-या पोस्टमध्ये त्याने काळ्या रंगाची शेरवानी घातलीय. आणि शाहरूख पूढे म्हणतो,”स्टिफन किंग यांच्या ओळी आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या मुलासोबत प्रवास करता, तेव्हा त्याच्या खिशातून एक काळा माणूस तुमच्या आत्म्यासोबत प्रवास करत असतो. आपल्या सर्वांमध्ये एक काळी आणि एक श्वेत छाया असते. या काळ्या-गो-यातलं नक्की काय घायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. तेव्हा विचार करून निवड करा.”
शाहरूखच्या या पोस्टरवर 'बनिये का दिमाग और मियाँ भाई की डेअरिंग' अशा ओळी लिहील्या आहेत. आणि हिच वाक्य या चित्रपटामध्ये त्याच्या तोंडीही दिसणार आहेत. याच कारण आहे, ‘रईस’मध्ये शाहरूख खान एका गुजराती मुसलमान डॉनच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. १९८०च्या सुमारासचा गुजरातमधला हा डॉन आणि त्याची कथा एक्शन थ्रिलर ‘रईस’मधून उलगडेल.
राहूल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ चित्रपटामध्ये शाहरूख खानसोबत नवाझुद्दिन सिद्दिकी आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानही दिसणार आहे.
विशेष म्हणजे, रेड चिलीज आणि एक्सेल प्रॉडक्शनची निर्मिती असणारी ही फिल्म पुढच्यावर्षी सलमानच्या ‘सुलतान’ या चित्रपटासोबत ईदला रिलीज होणार आहे. थोडक्यात काय, तर पुढच्यावर्षी ‘सुलतान’ सलमान खान आणि ‘रईस’ शाहरूख खान यांची एकमेकांसमोर बॉक्स ऑफिसवर होणारी टक्कर पाहणं, औत्सुक्याचेच ठरेल.
पुढील स्लाइडवर पाहा, शाहरूखच्या 'रईस'चा फस्ट लूक टिझर