आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'चे दिग्दर्शक म्हणाले, ''श्रीदेवीविषयी 'ते' वक्तव्य करायला नको होते, ती माझी चुक होती''

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बाहुबली’ या सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांची शिवगामीच्या भूमिकेसाठी पहिली पसंती बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीला होती. पण श्रीदेवीने या भूमिकेसाठी घसघशीत मानधनाची मागणी केली होती. त्यामुळे राजामौली यांनी तिला सिनेमासाठी साइन केले नव्हते. त्यानंतर राम्या कृष्णनची वर्णी या भूमिकेसाठी लागली होती.
 
काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत राजामौली यांनी श्रीदेवीने मागितलेल्या मानधनाचा आकडा जाहीर केल्याने त्यावरुन वाद निर्माण झाला. श्रीदेवी राजामौलींवर नाराज झाल्याचे वृत्त समोर आले. राजामौलींच्या वक्तव्यावर आपण नाराज असल्याचीही प्रतिक्रिया श्रीदेवीने दिली होती. पण, आता मात्र राजामौलींना त्यांच्या वक्तव्याचा पश्चाताप झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजामौली  यांनी आपली चुक मान्य केली आहे. ते म्हणाले, ‘मी या सर्व खासगी गोष्टी जाहिरपणे सांगायला नको होत्या. ती माझी चूक होती आणि त्याबद्दल मला पश्चातापही आहे.’
 
पुढे ते म्हणाले, ‘मुंबईसारख्या शहरात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची पताका अभिनमानाने उभी आहे ती म्हणजे फक्त श्रीदेवी यांच्यामुळे. मला त्यांच्याविषयी फार आदर आहे. त्यांच्या मॉम या
सिनेमाला अपेक्षित यश मिळो हिच सदिच्छा.’
 
पुढे वाचा, श्रीदेवी म्हणाली होती, 'मी 10 कोटींची मागणी केलीच नव्हती'... 
बातम्या आणखी आहेत...