आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जंजीर'च्या रिलीजला 42 वर्षे पूर्ण, आता या जगात राहिले नाहीत सिनेमातील हे 8 स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेते प्राण आणि अजीत)
मुंबईः प्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि अमिताभ-जया बच्चन स्टारर 'जंजीर' या सिनेमाच्या रिलीजला 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा आनंद बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला. 11 मे 1973 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने बिग बींना 'अँग्री यंग मॅन'च्या रुपात ओळख मिळवून दिली. अमिताभ यांच्या करिअरमध्ये हा सिनेमा मैलाचा दगड ठरला. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर बिग बींनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांचे एकामागून एक हिट सिनेमे रिलीज झाले.
Divyamarathi.com तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून या सिनेमातील अशा कलाकारांविषयी सांगत आहे, जे आता या जगात नाहीत.
अभिनेते अजीत
अजीत यांनी या सिनेमात सेठ धरम दयाल तेजा हे पात्र साकारले होते. अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. 'जंजीर'नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली. खरं तर त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांची एन्ट्री ही हीरोच्या रुपात झाली होती. त्यांचे खरे नाव हामिद अली खान असे होते. आज अजीत आपल्यात नाहीत. 12 ऑक्टोबर 1998 मध्ये वयाच्या 76 व्या वर्षी अजीत यांनी या जगाचा निरोप घेतला.
अभिनेते प्राण
ख्यातनाम अभिनेते प्राण आज या जगात नाहीत. 12 जुलै 2013 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 'जंजीर' या सिनेमात त्यांनी अमिताभ बच्चन अर्थातच इन्स्पेक्टर विजय खन्नाचा मित्र शेर खानची भूमिका वठवली होती. त्यांचा सिनेमातील लूक आणि संवाद शैली ही पठाणी होती. रंजक गोष्ट म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून बिग बी आणि प्राण यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर ही जोडी 14 सिनेमांमध्ये एकत्र झळकली.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, 'जंजीर'मधील आणखी काही कलाकारांविषयी...