आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांनंतर आता अशी दिसते 'तुम बिन'ची अॅक्ट्रेस, मराठी बिझनेसमनसोबत थाटले आहे लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री संदली सिन्हा साळस्कर - Divya Marathi
अभिनेत्री संदली सिन्हा साळस्कर
मुंबई: दिग्दर्शक अनुभव सिन्हा त्यांच्या 'तुम बिन' या सुपरहिट सिनेमाचा सिक्वेल घेऊन येत आहेत. 15 वर्षांपूर्वी हा सिनेमा रिलीज झाला होता. आता 'तुम बिन 2' या सिनेमात 'यंगिस्तान' आणि 'क्या सुपर कूल है हम' फेम नेहा शर्मा मुख्य भूमिकेत असेल. तिच्या अपोझिट आदित्य सील आणि आशिम गुलाटी दिसणार आहेत. 'तुम बिन 2' पहिलाच सिनेमा असेल, ज्यात अंकित तिवारी संगीतकार म्हणून पुढे येणारेय.
15 वर्षांत इतकी बदलली स्टारकास्ट...
गेल्या 15 वर्षांत 'तुम बिन' सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये बराच बदल झालेला दिसतो. या सिनेमात अभिनेत्री संदली सिन्हाने 'पिया' ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती. संदलीचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी राहिले नाही. 2005 मध्ये तिचे प्रसिद्ध बिझनेसमन किरण साळस्करसोबत लग्न झाले. किरण हे मराठी असून त्यांचे प्रसिद्ध ब्रेड ब्रॅण्ड आहे. संदली आणि किरण यांना दोन मुले आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 'तुम बिन'ची स्टारकास्ट आता कशी दिसते आणि काय करतेय...
बातम्या आणखी आहेत...