आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशच्या मुलाचे झाले बारसे, नाव ठेवले 'राहिल', जाणून घ्या Starkids च्या नावांचा अर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे बारसे केले आहे. 'राहिल' (RAHYL) असे बाळाचे नाव ठेवल्याची माहिती रितेशने ट्विटरवर दिली आहे.

रितेशने काळ्या बॅकग्राऊण्डवर गुलाबी अक्षरात राहिल असे लिहिलेला एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ‘राहिल- देशमुख कुटुंबातील सर्वात लहानगा’ असे कॅप्शन त्याने या इमेजला दिले आहे. जेनेलियाने हा फोटो रिट्वीट करत राहिल रितेश देशमुख असे लिहिले आहे.

रितेश-जेनेलियाच्या दुसऱ्या बाळाचा जन्म 1 जून 2016 रोजी झाला होता. तर त्यांचा मोठा मुलगा रिआनचा जन्म 25 नोव्हेंबर 2014 रोजी झाला होता.

रितेश-जेनेलियाने आपल्या बाळासाठी युनीक नाव शोधले आहे. राहिल या नावाचा अर्थ निरागस असा होतो.

या सेलेब्सच्या मुलांची नावेसुद्धा आहेत युनीक...
आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. आराध्या, नितारा, आझाद, अबराम, शाहरान, सायरा, वियान ही बी टाऊनच्या अभिनेत्यांच्या मुलांची नावे आहेत. या प्रत्येक नावाचा काही तरी अर्थ आहे.

सेलिब्रिटी किड्सच्या नावाचा अर्थ जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....
बातम्या आणखी आहेत...