आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड्स नाइटमध्ये स्टनिंग लुकमध्ये दिसली इलियाना-माधुरी-विद्या, सलमानही पोहचला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार स्क्रिन अवॉर्ड 2017 च्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेला, माधुरी दीक्षित आणि इलियाना डिक्रूज. - Divya Marathi
स्टार स्क्रिन अवॉर्ड 2017 च्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेला, माधुरी दीक्षित आणि इलियाना डिक्रूज.

मुंबई - एमएमआरडीए ग्राऊंड येथील बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स येथे स्टार स्क्रिन अवॉर्ड सोहळा झाला. यावेळी रेड कार्पेटवर माधुरी दीक्षित, उर्वशी रौतेला, इलियाना डिक्रूज, तापसी पन्नू, कृति सेनन, डायना पेंटी, विद्या बालन, जायरा वसीम, भूमी पेडणेकर, मनीषा कोइराला, नीतू चंद्रा, स्वरा भास्कर, नेहा धूपिया सह बॉलिवूडच्या अनेक अॅक्ट्रेस स्टनिंग लूकमध्ये दिसल्या. 
 
 दंगलने जिंकले एक डझन अवॉर्ड 
 - अवॉर्ड नाइटमध्ये 'दंगल'ने तब्बल एक डझन (12)  अवॉर्ड आपल्या नावावर केले. 'बरेली की बर्फी'ला दोन अवॉर्ड मिळाले. 
 - नुकतीच रिलीज झालेली 'तुम्हारी सुलु' या विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या फिल्मने 3 अवॉर्ड आपल्या नावे केले. 
 - बेस्ट फिल्म एडिटिंगचा अवॉर्ड दंगलसाठी बल्लू सलूजाला मिळाला. 
 - बेस्ट साऊंड डिझाइन अवॉर्ड शाहजीत कोयरी (रंगून) आणि बेस्ट कोरियोग्राफीचा अवॉर्ड श्यामक दावरला जग्गा जासूसमधील उल्लू का पट्ठा गाण्यासाठी मिळाला. 
 - अरजित सिंहला जालिमासाठी प्लेबॅकसाठीचा अवॉर्ड मिळाला. साशा तिरुपतीला  'शुभ मंगल सावधान' मधील गाणे 'कान्हा' साठी बेस्ट फिमेल सिंगरचा अवॉर्ड मिळाला. 
- प्रितमला दंगलसाठी बेस्ट म्यूझिक आणि बॅकग्राऊंड स्कोअरसाठी तर अमिताभ भट्टाचार्यला दंगलसाठी बेस्ट लिरिक्सचा  अवॉर्ड मिळाला. 
- बरेली की बर्फीसाठी नितेश तिवारी आणि आश्विनी अय्यर यांना बेस्ट डायलॉग्ज अवॉर्ड मिळाला. 

 

हे ठरले बेस्ट अॅक्टर आणि अॅक्ट्रेस 
- विद्या बालनने 'तुम्हारी सुलु'साठी बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड पटकावला. 
- न्यूटन साठी राजकुमार रावला बेस्ट क्रिटिक अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. 
- कोंकणा सेन शर्माला 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'साठी बेस्ट अॅक्ट्रेस पॉपुलर अवार्ड देण्यात आला. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण-कोण आले अवॉर्ड फंक्शनला... 

बातम्या आणखी आहेत...