आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AWARDS NIGHT मध्ये गळाभेट घेताना दिसल्या रेखा-जया, पाहा INSIDE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गळाभेट घेताना जया आणि रेखा - Divya Marathi
गळाभेट घेताना जया आणि रेखा

मुंबईः शुक्रवारी रात्री मुंबईत स्टार स्क्रीन अवॉर्ड्स सोहळ्यात एक दुर्मिळ चित्र पाहायला मिळाले. या सोहळ्यात जया बच्चन आणि रेखा चक्क गळाभेट घेताना दिसल्या. सोहळ्यात अमिताभ बच्चनसुद्धा हजर होते. एकेकाळी रेखा आणि अमिताभ यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. याच कारणामुळे जेव्हाही जया आणि रेखा एकत्र येतात, तेव्हा त्या चर्चेचा विषय ठरतात.
अमिताभ-जया यांच्यापासून ब-याच लांब बसल्या होत्या रेखा
या सोहळ्यात अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा हे तिन्ही स्टार्स एकाच रांगेत बसले होते. अमिताभ आणि जया एकत्र तर रेखा त्यांच्यापासून सात ते आठ चेअर दूर लांब बसलेल्या दिसल्या.
रणवीर-दीपिका ठरले सेंटर ऑफ अट्रॅक्शन
सोहळ्यात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्यावर उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी दोघांचीही भेट घेतली. शिवाय बिग बींशी भेटताना रणवीरने चक्क त्यांना साष्टांग घालून नमस्कार केला. शिवाय हात जोडून बिग बींनी दीपिकाची भेट घेतली. सोहळ्यात रणवीर सिंहच्या परफॉर्मन्सवरसुद्धा उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या.
अक्षयसोबत मस्ती करताना दिसला रणवीर
या इव्हेंटमध्ये रणवीर सिंह, अक्षय कुमारसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसला. दोन्ही स्टार्सनी एकत्र ठुमकेसुद्धा लावले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सोहळ्यातील कसा होता आतील नजारा...