एंटरटेनमेंट डेस्क - जेनेलिया डिसुजा 30 वर्षांची झाली आहे. 5 ऑगस्ट 1987 ला मुंबई महाराष्ट्रात जन्मलेल्या जेनेलियाने अॅक्टर रितेश देशमुखबरोबर लग्न केले आहे. दोघांची लव्ह स्टोरी अत्यंत मजेशीर आहे. दोघे एकमेकांना भेटण्यासाठी मीटींग असल्याचे कारण सांगून जायचे. दोघे नेहमी एका कॉफी शॉपवर भेटायचे. त्यामुळे त्यांच्या डेटींगबाबत ही आयडिया रितेशची होती. जेनेलियालाही ती प्रचंड आवडली होती. कारण कामाच्या निमित्तानेच त्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवायची संधी मिळायची. जेनेलिया आणि रितेश यांनी स्वतः एका डेटींग साईटवर याबाबत माहिती दिली होती.
अनेक वर्षे डेटींगनंतर केले लग्न..
2012 मध्ये जेनेलियाने रितेश देशमुखबरोबर लग्न केले. दोघांनी 'तुझे मेरी कसम'मध्ये एकत्र काम केले, तेव्हापासूनच त्यांच्या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांना त्याचवेळी एंगेजमेंट करायची होती, पण रितेशचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यासाठी तयार नव्हते असे म्हटले जाते. त्यामुळे जेनेलियाने रितेश आपला चांगला मित्र असल्याचे सांगत अफेयरबाबत सर्व अफवा असल्याचे म्हटले. 2012 मध्ये त्यांचा 'तेरे नाल लव्ह हो गया' चित्रपट सुरू होता तेव्हा पुन्हा त्यांच्या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या. त्याचवर्षी 3 फेब्रुवारीला त्यांनी लग्न केले. दोघांनी आधी महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते.
जेनेलियाने या चित्रपटांत केले काम..
'जाने तू...या जाने ना' (2008), 'मेरे बाप पहले आप' (2008), 'लाइफ पार्टनर' (2009), 'चान्स पे डान्स' (2010), 'फोर्स' (2011), 'तेरे नाल लव्ह हो गया' (2012) आणि 'जय हो' (2014) अशा अनेक चित्रपटात जेनेलियाने काम केले आहे. 2003 मध्ये तिने 'तुझे मेरी कसम' द्वारे करिअर सुरू केले होते.
जेनेलिया -रितेशला आहेत दोन मुले
रितेश आणि जेनेलिया सध्या बॉलिवूडच्या हॉटेस्ट कपल्सपैकी एक आहेत. दोघे एकमेकांबरोबर खूप आनंदी आहेत. दोघांना दोन मुले रियान आणि राहील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, जेनेलिया-रितेशचे 8 Wedding Photos..