आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्या जीवनावर असेल नागराज मंजुळेंचा आगामी सिनेमा! बिग बी साकारणार ही भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - 'सैराट'मुळे घराघरात पोहोचलेला संवेदनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याची चर्चा नुकतीच झाली. विशेष म्हणजे नागराज, बिग बींबरोबर त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट करणार असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे नागराज आणि बिग बींच्या या नव्या प्रोजेक्टबाबत कमालिची उत्सुकता आहे. आता नागराज अमिताभला घेऊन नक्की कोणता चित्रपट करणार याचे कुतुहूल सर्वांच्या मनात आहे. त्याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.

हा असेल आगामी चित्रपट..
- नागराज मंजुळेचा आगामी चित्रपट हा फुटबॉलच्या माध्यमातून गरीब किंवा झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलणाऱ्या विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असल्याची माहिती समोर येत आहे. 
- विजय बारसे हे फुटबॉल प्रशिक्षक असून झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या जीवनात त्यांनी अनेक बदल घडवले आहेत. 
- त्यांच्याच जीवनावर आधारित असलेला आगामी चित्रपट नागराज करत असून त्यात बिग बी विजय बारसे यांची म्हणजे एका फुटबॉल कोचची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे. 
- विजय बारसे मूळचे नागपूरचे असून त्यांनी फुटबॉलच्या माध्यमातून गुंडगिरीत अडकलेल्या अनेक गरीब तरुणांना चांगल्या मार्गावर परत आणण्याचे काम केले आहे. 
- स्लम सॉकर नावाच्या संस्थेच्या मार्फत ते गरीब मुलांना मदत करतात. 

बिग बी घेणार शाहरुखकडून धडे
बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी शाहरुखची मदत घेणार असल्याचीही माहिती मिळत आहे. शाहरुख खानने 'चक दे इंडिया' चित्रपटात हॉकी कोचची भूमिका केली होती. त्या भूमिकेला लोकांची पसंतीही मिळाली होती. त्यामुळे आता बिग बी कोचच्या या भूमिकेसाठी शाहरुखची मदत घेणार असल्याची माहिती मिळत आहे. बिग बी सध्या '102 नॉट आऊट' आणि 'कौन बनेगा करोडपती' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.   

कोण आहेत विजय बारसे
विजय बारसे नागपूरच्या हिसलॉप कॉलेमध्ये स्पोर्ट्स टीचर होते. एकदा कामानिमित्त जाताना पावसामुळे ते एका ठिकाणी थांबले. त्याठिकाणी मुले प्लास्टीकच्या तुटलेल्या बकेटने फुटबॉल खेळत होते. ते खेळण्यात ते व्यस्त झाले होते. त्यांनी त्या मुलांना फुटबॉल विकत घेऊन दिला आणि तुम्ही मॅच खेळणार का असे विचारले. ते मुले हो म्हणाले आणि दुपारी त्यांची मॅच सरांनी घेतली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, जेवढा वेळ ही मुले खेळली तेवढा वेळ त्यांनी काहीही वाईट काम केले नाही. तिथूनच विजय बारसे यांना ही कल्पना सुचली. त्यांनी मित्रांबरोबर चर्चा केली आणि अशा झोपडपट्टीतील किंवा गरीब मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा घ्यावी असे ठरवले. त्यांनी 32 संघांची स्पर्धा घेण्याचे ठरवले पण त्यांना 128 संघ मिळाले. यातूनही ही चळवळ मोठी झाली. 

सत्यमेव जयतेमध्ये झळकले
आमीर खानच्या सत्यमेव जयते या गाजलेल्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वामध्ये पहिल्याच भागात खेळामुळे एखाद्याचे जीवन कशाप्रकारे पूर्णपणे बदलता येऊ शकते हे दाखवले होते. त्यात विजय बारसे आणि त्यांच्यामुळे आयुष्य बदलेला त्यांचा एक विद्यार्थी आले होते. त्यावेळी त्यांना ओळख मिळाली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, विजय बारसे यांच्यामुळे संपूर्ण आयुष्य बदललेल्या एका तरुणाची कथा..
(सत्यमेव जयते या टीव्ही शोमध्ये अखिलेश यांनी त्यांची ही कहाणी सांगितली होती)
 
बातम्या आणखी आहेत...