आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cannes : \'तेव्हा चित्रपट महत्त्वाचा होता कपडे नव्हे\', शबाना आझमींनी शालजोडीतून झोडपले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1976 मधील शबाना आझमी, श्याम बेनेगल आणि स्मिता पाटील यांचा कानमधील फोटो. - Divya Marathi
1976 मधील शबाना आझमी, श्याम बेनेगल आणि स्मिता पाटील यांचा कानमधील फोटो.
एंटरटेनमेंट डेस्क - दीपिका, ऐश्वर्या आणि आज सोनम अशा बॉलीवूडच्या आघाडीच्या अॅक्ट्रेसेसची कानवारी सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय बनला आहे. मात्र ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी काही दिवसांपूर्वीच कानवारीतील झगमगाटावर लजोडे लगावले होते. 
 
सुमारे महिनाभरापूर्वीचे त्यांचे ट्विट सध्या कान महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आले आहे. याट्वीटमध्ये शबाना आजमी यांनी 1976 च्या त्यांच्या कानवारीचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शनमध्ये, 'तेव्हा चित्रपट महत्त्वाचा असायचा, कपडे नव्हे' असे ट्वीट करत त्यांनी विविध गाऊन परिधान करून मिरवणाऱ्या अभिनेत्रींना शालजोडीतील लगावले होते.

शेअर केला स्मिता पाटील, श्याम बेनेगल यांचा फोटो..
शबाना आझमी यांनी 1976 मधील त्यांच्या कानवारीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि दिग्दर्शक श्याम बेनेगलही होते. 'निशांत' या चित्रपटाची कान महोत्सवात निवड झाली होती. त्यासाठी स्मिता पाटील, शबाना आझमी आणि श्याम बेनेगल कानला गेले होते. ही आठवण शेअर करताना शबाना आझमी यांनी सध्याच्या झगमगाटावर त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा, १९७६ च्या कानवारीतील शबाना आझमी, स्मिता पाटील यांचा आणखी एक फोटो आणि यंदाच्या कानवारीतील अॅक्ट्रेसेस..
बातम्या आणखी आहेत...