Home »News» Story AboutMother-In-Law And Father-In-Law Of Amitabh Bachchan

आता अशी दिसते अमिताभ यांची सासू, अधिकाऱ्यांना म्हणाली होती, आम्हाला गोळ्या घाला

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 14:26 PM IST

भोपाल - अमिताभ बच्चन यांची सासरवाडी भोपाळमध्ये आहे. जया बच्चन यांचे वडील तरुण भादुरी त्यांच्या काळातील दिग्गज पत्रकार होते. जया यांच्या आईचे नाव इंदिरा भादुरी आहे. त्या भोपाळच्या श्यामला हिल्स परिसरात राहतात. अमिताभ यांच्या अनेक चित्रपटांचे शुटिंग भोपाळमध्ये झाले आहे. स्वतः अभिषेक आणि ऐश्वर्याही अनेकदा मुलगी अराध्या बरोबर आजीला भेटायला भोपाळला आलेले आहेत. जया बच्चन यांची बहीण रिता वर्माही भोपाळमध्येच राहते. त्यांचे लग्न राजीव वर्मा यांच्याशी झाले आहे. रिताशिवाय जया यांची आणखी एक बहीण आहे, तिचे नाव आहे नीता.
मूळची बिहारची आहे अमिताभ यांची सासू..
इंदिरा भादुरी यांचे नाव लग्नापूर्वी इंदिरा गोस्वामी होते. त्यांचे शिक्षण पाटणामध्येच झाले आहे. इंदिरा यांचे लग्न पत्रकार आणि लेखक तरुणकुमार भादुरी बरोबर झाले आहे. तरुणकुमार भादुरी तेव्हा भोपाळमध्ये इंग्रजी वृत्तपत्र 'स्टेट्समॅन' चे वार्ताहर होते. इंदिरा भादुरी आणि तरुण कुमार यांना तीन मुली झाल्या. त्यापैकी सर्वात मोठी आहे, जया भादुरी.
जेव्हा जयाच्या आई म्हणाल्या, आम्हाला गोळ्या घाला..
2006 मध्ये भोपाळ महानगरपालिकेच्या श्यामला हिल्स मधील अंसल एन्क्लेव्हची बाँड्री वॉल तोडण्यात आली होती. अपार्टमेंटचा आणखी काही भाग पाडला जाणार होता. त्यावर जया भादुरी यांच्या आई चांगल्याच संतापल्या होत्या. अपार्टमेंटमध्ये तोडफोड करण्याआधी आम्हाला गोळ्या घाला, असे म्हणत, त्यांनी राग व्यक्त केला होता.
चंबळच्या डाकुंबरोबर राहिले बिग बींचे सासरे
अमिताभ बच्चन यांचे सासरे तरुण भादुरी पत्रकार आणि लेखक होते. त्यांनी अनेक वृत्तपत्रांत काम केले. ज्यावेळी चंबळच्या खोऱ्यातील डाकुंनी गोंधळ घातलेला होता, तेव्हा त्यांनी त्यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी अभिशप्त जंगल नावाने बंगाली भाषेत एक पुस्तकही लिहिले नंतर त्याचे इंग्रजित भाषांतर करण्यात आले होते. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचा सुपरहिट चित्रपट शोले तरुण भादुरी यांच्या पुस्तकावरून प्रेरणा घेऊनच तयार केल्याचे म्हटले जाते. तरुण भादुरी यांचे 1996 मध्ये निधन झाले होते.
अभिषेक - ऐश्वर्या अनेकदा आले आहेत भोपाळला
अभिषेक आणि ऐश्वर्याही अनेकदा आजीला भेटायला भोपाळला येत असतात. ते इंदिरा भादुरी यांच्या वाढदिवसाला 2013 मध्ये याठिकाणी आले होते. इंदिरा सध्या भोपालमध्ये एकट्याच राहतात. जया बच्चन भोपाळमध्ये अनेकदा काली बाडी मंदिरात सिंदूर खेलासाठी आलेल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, काही संबंधित PHOTOS..

Next Article

Recommended