आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसिद्ध गायिकेची आपबिती, 'बॉलिवूडमध्ये वाईट लोक, अनेकांना ठेवायचे होते शारीरिक संबध'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः कास्टिंग काऊच बॉलिवूडमधील एक कटू सत्य आहे. याचा सामना येथे काम करणा-या अनेकांना करावा लागला आहे. फक्त अॅक्टर-अॅक्ट्रेसेसच नाही तर अनेक नावाजलेल्या गायकांनासुद्धा याचे दुःख सोसावे लागले आहे. अशीच एक गायिका आहे हेमा सरदेसाई, जी एक प्रसिद्ध आयटम गर्लसुद्धा राहिली आहे. एका मुलाखतीत तिने एक मोठा खुलासा करताना सांगितले, की संघर्षाच्या काळात इंडस्ट्रातील अनेकांनी तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली होती. हेमाने सांगितले, 'जिथेही गेली, तिथे लोकांनी वाईट नजरेनेच पाहिले'...

हेमाने मुलाखतीत सांगितले, "बॉलिवूडमध्ये अनेक वाईट लोकांचा सामना मला करावा लागला. मला चांगली व्यक्ती येथे भेटली नाही. ज्या स्टुडिओत मी काम मागायला गेली, तिथे प्रत्येकाने वाईट नजरेनेच माझ्याकडे पाहिले. त्यांना माझ्यासोबत शय्यासोबत करायची होती. त्यांनी मला इतर लोकांची उदाहरणं दिली. मात्र मी डिप्रेस झाली नाही. कारण मी संगीताची नेहमी पूजा केली आहे आणि कुणीही याचा अनादर करु शकत नाहीत. आजही माझ्या संगीतात देवाचा वास आहे.
50th स्वातंत्र्यदिनी केले होते सादरीकरण
मुंबईत जन्मलेल्या हेमाने अनेक अचिव्हमेंट्स मिळवल्या आहेत, ज्या इतर कुठल्याही गायकाच्या नावी नाहीत. 1989 मध्ये जर्मनीत झालेल्या इंटरनॅशनल पॉप साँग फेस्टिवमध्ये ग्रँड पिक्स अवॉर्ड आपल्या नावी करणारी हेमा एकमेव भारतीय गायिका आहे. याशिवाय लता मंगेशकर यांच्यासोबत 50 व्या स्वातंत्र्यदिनी सादरीकरण करणारी ती एकमेव फिमेल सिंगर होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, हेमाच्या आयुष्याशी निगडीत आणखी काही फॅक्ट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...