आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू ईयरच्या दुस-याच दिवशी आली या फेमस अॅक्ट्रेसच्या घटस्फोटाची बातमी, केले होते दुसरे लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास हिने पती सुबोध मस्कारापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 2 जानेवारी 2010 रोजी दोघांचे लग्न झाले होते. सात वर्षांनंतर आता दोघांनी त्यांच्या लग्नाच्या नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.  2016 हे वर्ष काही सेलिब्रिटी जोडप्यांसाठी फारसे चांगले नव्हते ही बाब सर्वज्ञात आहे. पण, 2017 या वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत असतानाच नंदिता दास आणि तिचा पती सुबोध मस्कारा यांनीही त्यांच्या वैवाहिक जीवनाला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. 47 वर्षीय नंदिताचे हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न सौम्य सेनसोबत झाले होते. 2002 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. मात्र 2007 मध्ये दोघे विभक्त झाले होते.  नंदिता आणि सुबोध मस्कारा यांना एक सहा वर्षांचा मुलगा आहे. 
 

नंदितामुळे थिएटरशी जुळले होते सुबोध... 
सुबोध उद्योगपती होते. त्यांनी अमेरिकेतील केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. टीव्ही सेट प्रॉडक्शनपासून ते प्लास्टिक बॉटल्सच्या रिसायकल बिझनेसमध्ये ते सक्रिय होते. त्यांचे छोटी या नावाने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. बिझनेसमध्ये बिझी असतानाच्या काळात त्यांची नंदितासोबत भेट झाली होती. नंदितामुळेच ते रंगभूमीवर आले. नंदिता त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांनी वेंचर सिनेप्लेची सुरुवात केली होती. याअंतर्गत ऑनलाइन थिएटर कंटेट प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन दिला. सुबोधसोबत लग्नानंतर नंदिता दिल्लीहून मुंबईत स्थायिक झाली होती. सुबोध यांनी नंदितासोबत रंगभूमीवर काम केले आहे. 
 
काय म्हणाली नंदिता...  
डीएनए ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नंदितानेच तिच्या या निर्णयाबद्दलची माहिती दिली. ‘होय हे खरे आहे. सुबोध आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. विचार करुनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमच्या मुलालाच आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे एका संवेदनशील मुलाचे पालक म्हणून आमचा हा निर्णय पूर्णपणे खासगी असून त्याबाबत तुम्ही आदर करा. याबाबतीत लपविण्यासारखे आणि आणखी काही उघडपणे बोलण्यासारखे काहीच नाही.’, असे नंदिता म्हणाली.
 
पुढे वाचा, मुलाला देणार पहिले प्राधान्य...
बातम्या आणखी आहेत...