आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sunidhi Chauhan First Time Flaunts 6 Months Baby Bump During Live Show In Mumbai!

सुनिधीने प्रथमच दाखवले 6 महिन्यांचे बेबी बंप, स्वतःच्याच गाण्यांवर एन्जॉय करताना दिसली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सिंगर सुनिधी चौहान काही महिन्यांत आई बनणार आहे. 14 ऑगस्टला एका वेबसाईटला तिचे वडील दुष्यंत चौहान यांनी सांगितले होते की, ती पाच महिन्यांची प्रेग्नंट आहे. त्यामुळे तिने बाहेर येणे जाणेही कमी केले आहे. नुकतीच ती मुंबईत एका लाइव्ह इव्हेंटमध्ये पोहोचली होती. त्याठिकाणी तिने प्रथमच 6 महिन्यांचे बेबी फ्लाँट केले. यावेळी तिने अनेक गाणी सादर केली. ऑडियन्सने ती गाणी भरपूर एन्जॉय केली. सुनिधी आणि तिचा दुसरा पती हितेश सोनिक यांचे हे पहिलेच बाळ आहे. 

18 व्या वर्षी केले होते पहिले लग्न.. 
- सुनिधीने दोन वेळा लग्न केले आहे. 
- वयाच्या 18 व्या वर्षी तिने (2002-03) कोरियोग्राफर बॉबी खानबरोबर पहिले लग्न केले होते. काही काळानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. 
- सुनिधीने हे लग्न कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन केले होते, असे म्हटले जाते. 
- बॉबीबरोबर घटस्फोटानंतर सुमारे 9 वर्षांनी 2012 मध्ये सुनिधी दुसरे लग्न म्युझिक डायरेक्टर हितेश सोनिक बरोबर केले. 

13 व्या वर्षी केला सिंगिग डेब्यू.. 
- सुमारे दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये आवाजादी जादू पसरवणारी सुनिधी 'इंडियन आइडल' आणि 'द व्हाइस' सारख्या शोची जजही राहिलेली आहे. 
- 1996 मध्ये तिने 13 व्या वर्षी 'शस्त्र' चित्रपटातून डेब्यू केला होता. 
- त्याचवर्षी 'मेरी आवाज सुनो' रियालिटी शोची ती विनर ठरली होती. तिला ओळख मिळाली ती 1999 मध्ये 'मस्त' चित्रपटातील 'रुकी रुकी सी जिंदगी' गाण्यामुळे. 
- तेव्हापासून आतापर्यंत तिने 'धूम मचाले' (धूम, 2004), 'सजनाजी वारी वारी' (हनिमून ट्रॅवल्स प्राइवेट लिमिटेड, 2007), 'चोर बाजारी' (लव आज कल, 2009), 'शीला की जवानी' (तीस मार खां, 2010), 'कमली' (धूम 3) आणि 'इश्क से बडा बखेडा' (टॉयलेट : एक प्रेम कथा, 2017) सारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, सुनिधी चौहानचे इव्हेंट्समधील इतर काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...