आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी देओलचा मुलगा करण करणार बॉलिवूड पदार्पण, आजोब धर्मेंद्र यांचे आहे या फिल्मशी खास कनेक्शन..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र, सनी, आणि करण देओल - Divya Marathi
धर्मेंद्र, सनी, आणि करण देओल
मुंबई - अभिनेता सनी देओल 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून त्याचा मुलगा करण देओलला लाँच करणार आहे. यासाठी झी स्टुडिओ आणि सनी देओल यांनी आपापसात कोलॅबरेट केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढच्या आठवड्यापासून मनाली येथे सुरु होणार आहे. सुपरस्टार धर्मेंद्र आणि सनी देओलचा मुलगा करण देओल घराण्याची चित्रपटसृष्टीतील तिसरी पीढी आहे. सनी देओलसाठी खास असणार 'पल पल दिल के पास' चित्रपट...
 
'पल पल दिल के पास' आहे एक लव्ह स्टोरी..
 
करणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात लव्ह स्टोरी दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे नाव  'पल पल दिल के पास' या गाण्याच्या ओळीतून घेण्यात आले आहे. 'ब्लॅक मेल' चित्रपटातील हे गाणे धर्मेंद्र यांच्या आवडीचे गाणे आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे नावही तेच ठेवण्यात आले आहे.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, मुलगा करणविषयी काय म्हटला सनी देओल..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...