आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी देओल म्हणतो, 'होय, मीच माझ्या मुलाला लाँच करणार'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(फाइल फोटोः मुलगा करणसोबत अभिनेता सनी देओल)

सनी देओलचा मुलगा करणच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यशराज बॅनरमधून नव्हे तर होम प्रॉडक्शनद्वारा सनी त्याला लाँच करणार आहे. २०१५ मध्येच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.
आपल्या मुलाला होम प्रॉडक्शनद्वारेच लाँच करत बहुप्रतिक्षित 'घायल वन्स अगेन' दिवाळीच्या मुहूर्तावर सलमान खानच्या चित्रपटासोबत प्रदर्शित होणार असल्याचे सनी देओलने सांगितले आहे.
पुढे बोलताना सनीने सांगितले की, 'अफवा नेहमीच पसरवल्या जातात, पण मला याबाबत वाद घालायचा नाही. आम्हाला काय करायचे हे चांगल्याप्रकारे माहीत आहे. याचा अर्थ असा नाही की, आम्ही दुसऱ्या बॅनरचा चित्रपट करणार नाही, पण करणची लाँचिंग आमच्याच बॅनरद्वारे केली आहे. मी विजेता फिल्म्सद्वारे पदार्पण केले होते. त्यानंतर बॉबी आणि अभयला लाँच केले. ही परंपरा कशी काय तोडणार? आम्ही स्वत:च चित्रपट निर्मिती करत असल्याने तो आपल्या पद्धतीने बनवू शकतो. स्वत: निर्मित चित्रपटाची मजाच वेगळी असते.'
या चित्रपटाबाबत तो म्हणतो, की 'बऱ्याचदा आपण केलेल्या विचारामध्ये बदल होत असतो. चित्रपटावर काम सुरू आहे. घायल वन्स अगेन प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही करणच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत.' सनीचा १९९० मधील 'घायल'चा सिक्वेल २५ वर्षांनंतर येत असून तो दिवाळीला प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. सनी म्हणाला की, 'शूटिंग पूर्ण झाली असून फक्त टक्के बाकी आहे. दिवाळीत किंवा दिवाळीनंतर लगेच आम्ही प्रदर्शित करण्याचा विचार करत आहोत.' सलमानचा 'प्रेम रतन धन पायो'देखील दिवाळीतच प्रदर्शित होणार आहे. याबाबत सनी म्हणाला की, 'चित्रपट तर प्रदर्शित होतच राहतात, पण यामुळे दोन अभिनेत्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते, हे म्हणणे चुकीचे आहे. मीडिया तसे वातावरण निर्माण करतो.

'प्रेमरतन...'सोबत 'घायल-२' आला तर सिनेमागृहे आणि थिएटर स्क्रीनची विभागणी होईल. मात्र, सनीचे असे म्हणणे आहे की, 'एवढा फरक पडणार नाही. सलमानचा, माझा किंवा इतर कुणाचा चित्रपट सोबत प्रदर्शित होईलच, असे सांगता येणार नाही. प्रत्येकाची आपापली आवड असते. ज्यांना घायल पाहायचा असेल ते लोक दुसरा चित्रपट पाहणार नाहीत. त्यामध्ये आपल्या आवडीच्या कलावंताचा विषय असेल तर हा मुद्दाच उपस्थित होणार नाही.'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, करण देओलची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...