आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Deol\'s Controversial Movie \'Mohalla Assi\' Trailer Leaked

सनी देओलच्या \'मोहल्ला अस्सी\'मध्ये शिव्यांचा भडिमार, लीक झाला ट्रेलर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ट्रेलर सीनमध्ये सनी देओल आणि साक्षी तंवर)
मुंबई- सनी देओल आणि साक्षी तन्वर स्टारर 'मोहल्ला अस्सी' या आगामी सिनेमाचा ट्रेलर लीक झाला आहे. हा सिनेमा काशिनाथ सिंह यांच्या 'काशी का अस्सी' या हिंदी कादंबरीवर आधारित आहे. सोशल मीडियावर लीक झालेला हा ट्रेलर वादग्रस्त असल्याचे दिसत आहे.
याची कहाणी वाराणसीमधील पर्यटकांच्या व्यावसायिकरणावर आधारित आहे. त्यामध्ये सनी
देओल एक पुजारी आहे. तो वाराणसीच्या नैसर्गिस आणि नैतिक प्रदूषणामुळे नाराज असतो. आपल्या संपूर्ण करिअरमध्ये कधीही शिवीगाळ न करणा-या सनी देओलने पहिल्यांदाच या सिनेमात शिवीगाळ केली आहे.
मंगळवारी (16 जून) लीक झालेल्या या ट्रेलरमध्ये स्टारकास्ट अश्लिल भाषेत बोलताना दिसतात. परंतु एक वादग्रस्त दृश्य असे आहे, की भगवान शिव स्वप्नात एका भक्ताला शिवागाळ करून रागवत आहेत.
डॉ. चंद्रप्रकाश व्दिवेदीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ते सध्या सेन्सॉर बोर्डचे सदस्य आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मोहल्ला अस्सी'चे ऑन-लोकेशन फोटो...
Note: सिनेमाचा ट्रेलर शिवागाळने भरलेला आहे, त्यामुळे आम्ही हा ट्रेलर दाखवू शकत नाहीत.