आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Deol's Son And Sridevi's Daughter Will Be Launched By Own Banner

श्रीदेवीची मुलगी आणि सनी देओलच्या मुलाला होम प्रॉडक्शनमधून केले जाईल लाँच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जान्हवी कपूर आणि रॉकी देओल - Divya Marathi
जान्हवी कपूर आणि रॉकी देओल
मुंबई. देओल कुटुंबाचा मुलगा करण अर्थातच रॉकी आणि श्रीदेवी-बोनी कपूरची थोरली मुलगा जान्हवी यांना डेब्यूसाठी अनेत ऑफर मिळत आहेत. परंतु दोन्ही कुटुंबीय त्यांना स्वत: लाँच करणार आहेत. मागील आठवड्यात साजिद नाडियाडवाला सनीला भेटला. अजेंडा होता, की रॉकीला नाडियाडवाला ग्रँडसनच्या बॅनरने इंडस्ट्रीमध्ये आणण्याचा. सूत्रांच्या सांगण्यानुसार, साजिद प्रोफेशनल म्हणून रॉकीला घेत नाहीये. त्याने स्पष्ट सांगितले, 'मी लेजेंड धर्मेंद्र यांच्या नातूला लाँच करण्याचा गौरव मिळवू इच्छितो.'
मैत्रीमुळे सनीच्या मुलाला लाँच करायचे आहे...
सनी लाज-या स्वभावाचा असल्याने तो साजिदच्या पार्ट्यांमध्ये जात नाही. परंतु दोघांनी घट्ट मैत्री आहे. सनी स्टारर 'जीत' सुपरहिट सिनेमातूनच निर्माता म्हणून साजिदने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. आजसुध्दा तो 'जीत'ला करिअरचा टर्निंग पॉइंट मानतो. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'साजिदने रॉकीसाठी तीन सिनेमांच्या करारासारख्या अटीसुध्दा ठेवल्या नाहीत. जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरला त्याने लाँच केले, परंतु तीन सिनेमांचा करारसुध्दा केला होता. परंतु रॉकीच्या बाबतीत असे घडले नाही. साजिदने तीन कहाणी आणि इलिजिबल दिग्दर्शकाची नावासुध्दा सनी समोर ठेवले. परंतु नकारसुध्दा दिला नाही. तो मुलाचा डेब्यू सिनेमा स्वत: दिग्दर्शित करेल. आता साजिद कोणत्या रुपाने सिनेमाशी जोडला जाईल, हा प्रश्न आहे.'
लॉस एंजिलिसमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतेय श्रीदेवीची थोरली मुलगी...
दुसरीकडे जान्हवी लॉस एंजिलिसमध्ये अभिनयाचे धडे गिरवत आहे. दोन वर्षांपासून निर्माते तिला अॅप्रोच करत होते. तेव्हा श्रीदेवी नकार देत होती. कारण तिच्या सांगण्यानुसार जान्हवी लहान होती. आता ती अभिनयाचे प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली आहे तर तिला लाँच करण्यासाठी वडील बोनी कपूरशी संपर्क साधला जात आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'बोनीने भाऊ अनिलचे करिअर रिव्हाइव केले केले. संजय कपूर, तब्बू, ईशा देओलला लाँच केले. सलमानसोबत हिट सिनेमे दिले. अशात ते आपल्या मुलीला इतर बॅनर अंतर्गत कसे लाँच करतील. जान्हवीचा सिनेमा ते आपल्या बॅनरखाली बनवण्याचे प्लानिंग करत आहेत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जान्हवी आणि रॉकीचे काही फोटो...