आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 कुटुंबांनी केले होते या मुलीला रिजेक्ट, मग सनी लिओनीने घेतले निशाला दत्तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सनी लिओनीने मागील महिन्यात एका 21 महिन्याच्या मुलीला दत्तक घेतले आहे. ही मुलगी लातूरची आहे. त्यांनी निशा कौर वेबर असे मुलीचे नाव ठेवलेले आहे. याअगोदर 11 जणांनी निशाला दत्तक घेण्यास नकार दिला होता. याचे कारण मुलीचा काळा रंग सांगण्यात आला होता.   

चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स एजेंसीने केला होता खुलासा..
- नुकतेच मुलांना दत्तक देणाऱ्या चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स एजेंसी (सीएआरए) चे सीईओ, लेफ्टिनेंट कर्नल दीपक कुमार यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. 
- त्यांनी सांगितले की, जास्तीत जास्तजण मुलाचा रंग, चेहरा, मेडिकल हिस्ट्री या गोष्टी विचारात घेतात आणि त्यामुळेच निशासारख्या मुलींकडे दुर्लक्ष होते. 
- हेच कारण होते ज्यामुळे निशाला 11 कुटुंबांनी दत्तक घेण्यास नकार दिला. पण सनी लिओनी आणि डॅनिअस वेबर यांनी निशाला दत्तक घेण्यास उत्सुक्ता दाखवली.
- सनीने निशाला दत्तक घेताना तिचा रंग, मेडिकल हिस्ट्री यांसारख्या गोष्टीची पर्वा केली नाही.

9 महिन्याच्या प्रोसेसनंतर मिळाली निशा..
- दीपक कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, सनीने इतर कुटुंबियांप्रमाणे लाईनमध्ये येत निशाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. 
- त्यांनी सांगितले की, कोणताही नियम न तोडता वेबर कपलने सर्व औपचारीकता पूर्ण केली.
- सनीने अप्लाय केल्यानंतर 9 महिन्यांनी तिला 21 जून 2017 रोजी निशाबद्दल सांगितले गेले. यानंतर दोघांनी निशाला दत्तक घेतले. 
  
  मुलाखतीत व्यक्त केली होती आई बनण्याची इच्छा..
  - सनीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत आई बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिने सांगितले होते की, "कोण जाणे काही दिवसांत मी एखादे लहान मुल घेऊन तुमच्यासमोर येईल आणि तुम्ही शॉक्ड राहाल की हे मुल कुठून आले." 
 - सनीने केलेही असेच आणि डायरेक्ट ती एका लहानशा मुलीला घेऊन मीडियासमोर आली.
 - सनीने बिझी शेड्यूलमुळे फॅमिली करण्याची इच्छा असतानाही वेळ नाही असे सांगितले होते. 
 
 पुढच्या स्लाईडवर वाचा, सनी लिओनी आणि डेनिअल वेबर यांचे निशासोबतचे PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...