आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा सनी-डॅनिअलचे \'निशा\'ला दत्तक घेतानाचे 5 PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
लातूरः अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांच्या आयुष्यात एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. 21 महिन्यांच्या चिमुकलीचे हे दोघे आईबाबा झाले आहेत. या दाम्पत्याने लातूर येथील एका अनाथ आश्रमातून मुलगी दत्तक घेऊन आयुष्यातील नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. निशा कौर वेबर हे त्यांच्या चिमुकलीचे नाव आहे. 14 ऑक्टोबर 2015 रोजी निशाचा जन्म झाला. निशाला दत्तक घेतल्यानंतरचे लातूरमधील एक्सक्लुझिव्ह फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 
मुलीला दत्तक घेतल्यानंतर सनी आणि डॅनिअल यांनी एका मुलाखतीत त्यांचा आनंद व्यक्त केला. डॅनिअल म्हणाला, ‘आमचं आयुष्य फार वेगळं आहे. इथे नऊ महिन्यांचा काहीही संबंध नव्हता. माझ्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया भरपूर कागदपत्र आणि दोन वर्षांपासून सुरु असलेली प्रक्रिया होती. एके दिवशी अचानक मला मेल आला हे सगळं सुखद होतं. दोन वर्षांपूर्वी आम्ही एका अनाथ आश्रमाला भेट दिली होती त्यावेळीच आम्ही हा मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला."
 

बहुतांश पालक मुलगा दत्तक घेतात. पण आम्ही मुलगी दत्तक घेतली आहे. निशा हिला आम्ही नाही तर तिनेच आम्हाला पालक म्हणून निवडले असल्याचे सनीने मुलाखतीत म्हटले आहे. सनी आणि डॅनिअल यांनी अनाथ आश्रमासाठी काम करण्याऱ्यांचे आभार मानले असून त्यांची प्रशंसा केली. निशाच्या नावाविषयी सनी म्हणाली, ‘ते तिचं स्वत:चं नाव होतं. आमच्या विचारातही काही नावं होती पण, ती तिची स्वत:ची ओळख आहे.’ 

पुढील स्लाईड्सवर बघा, लातूरमध्ये निशाला दत्तक घेतानाची सनी-डॅनिअलची छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...