Home »News» Sunny Leone And Daniel Weber Spotted With Adopted Daughter Nisha

मुलीबरोबर स्पॉट झाली सनी लियोनी, कॅमेऱ्यापासून चेहरा लपवायचा करत होते प्रयत्न

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 12:38 PM IST

  • मुलगी निशा कौर आणि पती डेनियल बेवरबरोबर सनी लियोनी.
मुंबई - सनी लियोनी नुकतीच मुलगी निशा कौर आणि पती डॅनियल वेबरबरोबर दिसली. यावेळी निशाने डेनिम टॉप आणि पिंक कलरची लेगिन परिधान केली होती. यावेळी ती वडील डॅनियल वेबरच्या कडेवर दिसली. एकिकडे डॅनियल तिचा चेहरा कॅमेऱ्यांपासून लपवत होता, तर सनीही लवकरात लवकर कारकडे जाण्याची घाई करताना दिली. सनी, मुलगी आणि पतीसह दिल्लीहून परतली. तिचा अपकमिंग चित्रपट 'तेरा इंतजार'च्या प्रमोशनसाठी ती मुंबईत आली होती.

22 महिन्यांची आहे सनीची मुलगी
- सनीने जुलै 2017 मध्ये पती डॅनियलसह एका 21 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतले. ती आता 22 महिन्यांची झाली आहे.
- ही मुलगी महाराष्ट्रातील लातूरमधील असून तिचे नाव निशा कौर वेबर ठेवले आहे.
- रिपोर्ट्सनुसार 11 कुटुंबांनी या मुलीला दत्तक घ्यायला नकार दिल्यानंतर सनीने तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. यामागचे कारण होते, या मुलीचा सावळा रंग.

9 महिन्यांच्या प्रक्रियेनंतर मिळाले बाळ..
- सनीने इतर कुटुंबांप्रमाणे कोणतेही नियम न मोडता बाळ दत्तक घेतले.
- सनीने 30 सप्टेंबरला CARA च्या वेब पोर्टलद्वारे बाळ दत्तक घेण्यासाठी अर्ज केला होता.
- अर्जानंतर 9 महिन्यांनी 21 जून 2017 ला तिला यामुलीबाबत सांगण्यात आले, तिला त्यांनी दत्तक घेतले.
- सनीने एका मुलाखतीत आई बनण्याबाबत मत व्यक्त केले होते. कामामुळे लगेचच बाळाला जन्म देता येणार नसला तरी इतर मार्गाने मी आई बनू शकते असे ती म्हणाली होती. काही दिवसांतच कदाचतित मी बाळाला घेऊन तुमच्यासमोर येऊ शकते असे सनी म्हणाली होती. सनीने तसेच काहीसे करत सर्वांना धक्का दिला होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...

Next Article

Recommended