आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Harassed By A Contestant Of Splitsvilla 8

OMG... हे काय, रिअॅलिटी शोमध्ये सनीसोबत झाली \'गंदी बात\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः 'स्प्लिट्सविला 8'चा होस्ट रणविजयसोबत सनी लिओन)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि होस्ट सनी लिओनसोबत एका रिअॅलिटी शोमध्ये छेडछाड झाल्याचे वृत्त आहे. सनी सध्या 'स्प्लिट्सविला 8' हा शो होस्ट करत असून या शोमध्ये एका स्पर्धकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप तिने केला आहे. सनीने हा आरोप शोच्या गेल्या पर्वातील स्पर्धक पारस छाबरावर लावला आहे. पारस छाबरा 'स्प्लिट्सव्हिला'च्या सातव्या सिझनचा विजेता आणि अभिनेत्री सारा खानचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आहे. सनी आता शोच्या निर्मात्यांवर याप्रकरणी अॅक्शन घेण्याचा दबाव टाकत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सनी शोची होस्ट असून तिला सर्व स्पर्धकांसोबत बातचित करावी लागते. शूटदरम्यान पारस आपल्या विनोदाने सनीला इम्प्रेस करण्याचा आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला सनीने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र जेव्हा तो मर्यादा ओलांडू लागला तेव्हा सनीने शोच्या निर्मात्यांकडे याची तक्रार केली.
प्रॉडक्शन टीमने पारसला ताकिद दिल्याचे समजते. सूत्रांनी सांगितले, की शूटदरम्यान सेटवर सनीचे पती डेनियल वेबरसुद्धा उपस्थित असतात. त्यामुळे सनीला त्रास देण्याची कुणीही हिंमत करत नाही. मात्र पारस तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे सनीने प्रॉडक्शन हाऊसला विनंती केली आहे, की त्यांनी शो लाँचला पारसा बोलावू नये.
यावर पारसने काय प्रतिक्रिया दिली, ते जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...