आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोनी आई बनण्याच्या तयारीत! इंटरव्ह्यूमध्ये असे दिले संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अॅक्ट्रेस सनीने तिच्या प्रेग्नंसीबाबत मोठा खुलासा केला आहे. मी लवकरच आई बनू शकते, असे सनीचे म्हणणे आहे, सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर लवकरच गोड बातमी देऊ शकतात. सनीने एका एंटरटेनमेंट चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटले आहे की, यावेळी आई बनणे शारीरिक दृष्ट्या कठीण आहे. पण जीवनात सध्या बरेच काही घडत आहे. काय माहीत, काही दिवसांत मी एक बाळ हातात घेऊन तुमच्या समोर येईल आणि सर्वांनाच धक्का बसेल, असा इशारा सनीने दिला. 

सनीच्या या वक्तव्यावरून ती सरोगसीद्वारे आई बनू शकते असे अंदाज बांधले जात आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही दिवसांत सरोगसीचे प्रमाण वाढले आहे. शाहरुख खान, सोहेल खान, करण जोहर, तुषार कपूर आणि नुकतेच कृष्णा अभिषेक- कश्मिरा शाहदेखिल सरोगसीच्या माध्यमातून पॅरेंट्स बनले आहेत. 

एकिकडे सनीने सरोगसीचे संकेत दिले, त्याचवेळी ती म्हणते, मी सरोगेसीबाबत श्योर नाही. मला असे वाटते की, देव तुमच्या जीवनात विविध क्षण निर्माण करत असतो. त्यातील एक तुम्हाला निवडायचा असतो, पाहुयात पुढे काय होते. सनीच्या या वक्तव्यावरून असे वाटते की, ती आई बनायला तयार आहे, पण सरोगसीचा वापर करावा की, नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहे.  
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सनीच्या जीवनातील इतर काही बाबी... 
 
बातम्या आणखी आहेत...