आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Along With Sunny Leone, Her Husband Daniel Weber Too Deserves A Standing Ovation!

'त्या' इंटरव्ह्यूनंतर नव-याने सनीला म्हटले 'ट्रू चॅम्पिअन', बायकोचे केले तोंडभरून कौतूक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सनी लिओन एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. मुलाखतकार भुपेंद्र चौबे यांनी तिला असे प्रश्न विचारले की, अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला. इतकेच नाही तर भुपेंद्र चौबे यांनी सनीचा उल्लेख ‘पॉर्न क्वीन’ असाही केला. यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून भुपेंद्र चौबेवर टीका केली तर तोल न ढासळता उत्तर देणाऱ्या सनीचे कौतुक केले. सनीचा नवरा डॅनिअल वेबरलासुद्धा आपल्या बायकोचा अभिमान वाटला आहे. त्याने सनीला 'ट्रू चॅम्पिअन' म्हणून संबोधले आहे. एका प्रसिद्ध वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत डॅनिअलने म्हटले, की त्याला सनीचा अभिमान असून जगातील कुणालाही त्याच्या पत्नीची पारख करण्याचा अधिकार नाहीये.
डॅनिअल नेहमीच सनीच्या पाठिशी खंबीर उभा असतो. खासगीच नव्हे तर प्रोफेशनल आयुष्यातही डॅनिअलची साथ सनीला मिळत असते. डॅनिअने एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट फायनल केल्यानंतर सनी तो सिनेमा साइन करत असते. सनी आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय डॅनिअलाच देते.
वाचा, परफेक्ट हसबंड डॅनिअलने काय म्हटलंय सनीविषयी...