आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत बॉलिवूडची बेबी डॉल! या भारतीय महिलांचाही समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी आणि गुगलवर सर्वात जास्त सर्च केली जाणारी अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या माहितीपटामुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा एक विषय सनीच्या निमित्ताने चर्चेसाठी मिळाला आहे. सनीने बीबीसीसारख्या मोठ्या प्रसारमाध्यमाला तिची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या 2016 च्या प्रभावशाली महिलांच्या यादीत आता सनी लिओनीलाही स्थान मिळालं आहे. बीबीसीने बिझनेस, इंजिनिअर, क्रीडा, उद्योजक महिला, फॅशन आयकॉन, कलाकार आदी क्षेत्रात आपल्या कामानं ठसा उमटवणा-या महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत सनीसोबतच सांगलीच्या गौरी चिंदरकर, चेन्नईच्या मल्लिका श्रीनिवासन, मुंबईच्या नेहा सिंग आणि कर्नाटकच्या सालूमराडा थिमाक्का यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात सनी लिओनीला स्थान देण्यात आलं आहे. बोल्ड आणि मादक अदांनी सनी लिओनीनं बॉलिवूडमध्ये पाच वर्षं गाजवली आहेत.
2011 मध्ये बिग बॉसपासून सुरू झालेला सनीचा प्रवास आजही सुरू आहे. बॉलिवूडमधल्या जिस्म 2, जॅकपॉट आणि एक पहेली लीला या चित्रपटांनी सनीला प्रसिद्धीच्या यशोशिखरावर नेलं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, या यादीत स्थान पटकावणा-या आणखी चार भारतीय महिलांविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...