आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाच्या लग्नात अशी सजली होती सनी लियोन, बघा ग्लॅमरस PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस (अमेरिका)- बॉलिवूड अभिनेत्री आणि पॉर्नस्टार सनी लियोन हिचा भाऊ संदीप वोहरा याचे गर्लफ्रेंड करिश्मा नायडूसोबत लग्न झाले. पारंपरिक शीख पद्धतीने अमेरिकेतील गुरुद्वात हे लग्न पार पडले. यावेळी सनी लियोन पंजाबी कुडीच्या अवतारात दिसली. तिने ब्लू पटियाला सूट परिधान केला होता. नवरदेवासाठी करण्यात येणाऱ्या सर्व चालीरीत तिने उत्साहाने भाग घेतला.
जुनमध्ये झाला होता साखरपुडा
जुन महिन्यात संदीप आणि करिश्माचा साखरपुडा झाला होता. यावेळी करिश्माच्या वतीने सनीने फोटो शेअर करत सोशल मीडियावर लिहिले होते, की मला तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य व्यतित करायचे आहे. हा विचार करुनच माझे मन आनंदाने भरुन गेले आहे. तू कायम माझा सनशाईन आहेस. मी आज, उद्या आणि आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत राहिल. मी खुप लकी आहे. माझ्या स्वप्नातील राजकुमारासोबत मी लग्न करत आहे.
प्रोफेशन शेफ आहे सनीचा भाऊ
सनी लियोनीचा छोटा भाऊ संदीप कॅलिर्फोनियामधील फेमस 'किंग्ज रो गेस्ट्रो' पबमध्ये एक्झिकेटीव्ह शेफ म्हणून काम करतो. त्याने तयार केलेल्या डिशेस ग्राहकांना खुप आवडतात. बोलवर्ड मॅग्झिननुसार, संदीप वोहराने फार कमी वयात पबमध्ये करिअरला सुरवात केली. आता त्याच्या प्रतिभेने सर्व संमोहित झाले आहेत. त्याच्या रुचकर स्वयंपाकामुळे कॅलिर्फोनिर्यात अगदी काही दिवसांत पब लोकप्रिय ठरला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, सनी लियोनच्या भावाच्या लग्नाचे फोटो... असे ग्लॅमरस कपडेही घातले होते सनी लियोनने...
बातम्या आणखी आहेत...