आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone In Surat For Film Ek Paheli Lila Promotion With Husband

सनी लिओनी विरोधात FIR, टॉपलेस फोटोंमुळे हंगामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री 'एक पहेली लीला' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी रविवारी (29 मार्च) सूरतमध्ये गेली होती. डायमंड हबमध्ये होणा-या या इव्हेंटमध्ये खूप गर्दी होती, म्हणून सर्वत्र गोंधळ उडाला होता. अखेर या इव्हेंटचे ठिकाण बदलून दुसरीकडे ठेवण्यात आला.
यादरम्यान एका स्थानिक नागरिकाने सनी लिओनीच्या विरोधात एफआरआय दाखल केली. यामागे सनीचे अर्धनग्न फोटोचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. इव्हेंटमध्ये लोकांना बोलवण्यासाठी सनीचे टॉपलेस फोटो दाखवण्यात येत होते. सनीचे हे फोटो मागील एप्रिलमध्ये व्हायरल झाले होते.
एका सूत्राच्या सांगण्यानुसार, सनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी वडोदराला गेली होती, त्यानंतर ती बाय रोड सूरतला पोहोचली. आयोजकांनी ऐनवेळी वेन्यू बदलून इव्हेंट दुस-या हॉटेलमध्ये शिफ्ट केला. यावेळी सनीचा पती डेनिअल वेबरसुध्दा तिच्यासोबत होता. शिवाय को-स्टार जय भानूशाली आणि सिनेमा दिग्दर्शक बॉबी खानसुध्दा येथे उपस्थित होते.
'एक पहेली लीला'चे दिग्दर्शन बॉबी खानने केले आहे. सिनेमा सस्पेन्स आणि हॉरर असल्याचे दिसते. सनी या सिनेमात तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. सनीसोबत या सिनेमात जय भानूशाली, रजनीश दुग्गल आणि राहूल देव यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमा 10 एप्रिल रोजी रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीचे या इव्हेंटमधील काही फोटो...