Home »News» Sunny Leone Item Song In Movie Bhoomi

80Kg वजन कमी केल्यानंतर सनी लिओनीला डान्स शिकवायला पोहोचला गणेश आचार्य, PHOTOS

दिव्य मराठी | Aug 13, 2017, 16:25 PM IST

मुंबई - संजय दत्तचा कमबॅक चित्रपट 'भूमी' मध्ये लवकरच सनी लिओनीचे आयटम साँग पाहायला मिळणार आहे. नुकतेच या गाण्याचे बिहाईंड द सीन फोटोज् समोर आले आहेत. ज्यात सनी बॅक डान्सर्ससोबत परफॉर्म करताना दिसत आहे. गणेश आचार्य शिकवतोय डान्स..
- नुकतेच गणेशला सनी लिओनीला डान्स शिकवताना पाहण्यात आले.
- गणेश सध्या त्याच्या ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. गणेशचे 200 किलो वजन होते. त्याने त्यातील 80 किलो वजन कमी केले आहे.
'ट्रीपी-ट्रीपी' टायटल असलेल्या या गाण्याचे शूटिंग शनिवारी पूर्ण झाले आहे. हे गाणे कोरिओग्राफर गणेश आचार्यने कोरिओग्राफ केले आहे. सनीचा या फोटोंमध्ये हॉट आणि बोल्ड अंदाज समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच सनीने तिच्या या गाण्याबद्दल माहिती दिली होती.
गणेश आचार्यसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल सनीने सांगितले की, "गणेश एक कडक कोरिओग्राफर आहे. त्याने गाण्यात काही अवघड स्टेप दिल्या आहेत ज्या नीट व्हाव्या यासाठी मी मेहनत घेत आहे. तिने सांगितले की, या गाण्याचे बोल आणि संगीत उत्तम आहे जे तरुण-तरुणींना नक्की आवडेल."
तीन दिवसांपूर्वीच भूमीचे ट्रेलर रिलीज झाले आहे ज्यात संजय दत्त आणि आदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी हा चित्रपट बनवला आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, सनी लिओनीची गाण्याच्या शूटिंगदरम्यान सेटवरील काही PHOTOS...

Next Article

Recommended